Home आपला जिल्हा Breaking News माऊंट कॉन्व्हेंट अ‍ॅण्ड ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्स, मुल इयत्ता दहावीचा १०० टक्के...

माऊंट कॉन्व्हेंट अ‍ॅण्ड ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्स, मुल इयत्ता दहावीचा १०० टक्के निकाल

245

दिशा फाउंडेशन संचलित 🌸🌸

🏫 माऊंट कॉन्व्हेंट अ‍ॅण्ड ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्स, मुल 🏫

✨🎉 इयत्ता दहावीचा १०० टक्के निकाल : यशाची परंपरा कायम! 🎉✨

📍 मुल : दिशा फाउंडेशन संचलित माऊंट कॉन्व्हेंट अ‍ॅण्ड ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्स, मुल येथील इयत्ता दहावीचा निकाल यंदाही शंभर टक्के लागून विद्यालयाने यशाची उज्ज्वल परंपरा कायम राखली आहे. विद्यार्थ्यांच्या घवघवीत यशामुळे संपूर्ण परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. 🌟
🥇 विद्यालयातून वेदांग तुफान अनंततुलवार याने ९४.८० टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला.
🥈 तसेच तन्वी सुधाकर भुरसे हिने ९४.४० टक्के गुणांसह द्वितीय क्रमांक मिळविला.
🥉 तर श्रेया दत्तू गोंगले हिने ९४.०० टक्के गुण प्राप्त करून तृतीय क्रमांक संपादन केला.
🌺 याशिवाय विद्यालयातील इतर विद्यार्थ्यांनीही उत्कृष्ट यश संपादन करून विद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.
💯 विद्यार्थिनी पूर्वा विवेक मोहुर्ले हिने विज्ञान विषयात १०० पैकी १०० गुण मिळवत विशेष प्राविण्य संपादन केले. 👏👏
🌼 विद्यार्थ्यांनी आपल्या यशाचे श्रेय मुख्याध्यापिका, वर्गशिक्षक, विषय शिक्षक तसेच पालकांना दिले.
💐 या उल्लेखनीय यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष भाऊराव झाडे सर, मुख्याध्यापिका रीमा कांबळे मॅडम, वर्गशिक्षक अशफाक सय्यद सर, कनिष्ठ महाविद्यालय प्रभारी दुष्यंत गणवीर सर तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. 🌷
🌸🌸 विद्यालयाच्या या अभिमानास्पद यशामुळे पंचक्रोशीत सर्वत्र कौतुकाचा वर्षाव होत आहे. 🌸🌸