ट्रॅक्टर उलटल्याने एकाचा मृत्यू
भेजगाव : सिंतला तेनलेश्वर मार्गावरीलउमा नदीच्यापुलाजवळ ट्रॅक्टरचा स्टेअरिंग लॉक झाल्याने झालेल्या भीषण अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला, तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. ही घटना मंगळवारी सायंकाळी ५:३० वाजताच्या सुमारास घडली. विकास बंडू लेणगुरे (३६, रा. येसगाव) असे मृताचे नाव असून, अनुप रामप्रसाद मोहुर्ले (२५) हा तरुण गंभीर जखमी झाला आहे. येसगाव येथून शेणखत भरून ट्रॅक्टर दहेगाव येथील शेतात जात असताना स्टेअरिंग लॉक याले होते.








