Home आपला जिल्हा Breaking News ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर’

‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर’

36

अभियानांतर्गत चिरोली येथील महात्मा ज्योतीबा फुले हायस्कूल येथे समाधान शिबिराचे उद्घाटन
उपविभागीय अधिकारी अजय चरडे यांच्या हस्ते झाले.
महसूल विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या या अभियानाद्वारे नागरिकांना सर्व शासकीय योजनांचा लाभ मिळवून देणे हेच याचे मुख्य उद्दिष्ट आहे. याद्वारे अधिकाधिक नागरिकांना योजनांचा लाभ मिळवून समाधान शिबिराकडे प्रत्येक नागरिकाच्या समस्यांचे तत्काळ निराकरण
शिबिरात विद्यार्थी, महिला, दिव्यांग तसेच सर्वसामान्य नागरिकांना विविध शासकीय दाखल्यांसाठी अर्ज भरून घेण्यात आले व दाखले वितरित करण्यात आले. विविध शासकीय विभागांमार्फत देण्यात येणाऱ्या योजनांचा लाभ नागरिकांना देण्यात आला.

नायब तहसिलदार पवार यांनी प्रास्ताविक केले. शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी तहसीलदार मृदुला मोरे, नायब तहसिलदार चिडे,पंदीले,पवार आदींनी प्रयत्न केले.

महाराष्ट्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान’ अंतर्गत चिरोली मंडल स्तरावरील ‘समाधान शिबिर’ शनिवार, दि. 17 ए​प्रिल २०२६ रोजी महात्मा ज्योतीबा फुले हायस्कूल चिरोली येथे अत्यंत उत्साहात पार पडले. या शिबिराच्या माध्यमातून महसूल विभागाने आपली सेवा थेट जनतेच्या दारात आणली असून, एकाच छताखाली शेकडो नागरिकांचे प्रलंबित प्रश्न निकाली काढण्यात आले.
या शिबिराचे उद्घाटन उपविभागीय अधिकारी अजय चरडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर मूल तहसिलचे तहसीलदार मृदुला मोरे,नायब तहसिलदार तसेच सरपंच माजी सरपंच ,पदाधिकारी,लोकप्रतिनिधी यांची प्रमुख उपस्थिती होती.आणि परिसरातील प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रशासनाने या शिबिरासाठी जय्यत तयारी केली होती, ज्याचा फायदा चिरोली मंडळातील गावांना झाला. विविध दाखल्यांचे वाटप करण्यात आले,डिजिटल ७/१२ आणि २५९ ‘८अ’ उताऱ्यांचे वितरण झाले, फेरफार निकाली काढले असून, सातबारा दुरुस्तीचे अर्ज स्वीकारण्यात आले, अर्जांवर जागीच कार्यवाही करण्यात आली. तसेच शिबिरात भूसंपादन व अकृषक (NA) परवानगीची प्रलंबित प्रकरणे मार्गी लावून गाव दप्तर अद्यावत करण्यात आले.
शिबिर यशस्वी करण्यासाठी चिरोली मंडल अधिकारी ,तलाठीनिवासी नायब तहसीलदार पवार , नायब तहसिलदार पंडीले,संजय गांधी निराधार नायब तहसिलदार चिडे,पुरवठा विभागाच्या शिरभाते, आणि विविध गावांतील ग्राम महसूल अधिकाऱ्यांनी (तलाठी) विशेष परिश्रम घेतले.तसेच सेतू केंन्द्र व आधार केंन्द्र आॅपरेटर,आरोग्य विभागातील कर्मचारी तसेच ​चिरोली महसूल साजातील विविध गावातील पोलीस पाटील उपस्थित होते , विविध विभागातील कर्मचारी वृंद तसेच विद्यार्थी,नागरीक,महिला मोठया संख्येने उपस्थित होते.