Home आपला जिल्हा Breaking News जिद्द असेल तर आकाशही ठेंगणं! फुटाणा मोकासा ग्रामीण भागातील दोन्ही बहिणी बनल्या...

जिद्द असेल तर आकाशही ठेंगणं! फुटाणा मोकासा ग्रामीण भागातील दोन्ही बहिणी बनल्या पोलिस; गरिबीतल्या संघर्षाची ही गोष्ट वाचून डोळे पाणावतील

1053

अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत, वडील गणपूर रै ता -चामोर्शी जिल्हा -गडचिरोली सोडून फुटाणा मोकासा या गावातील प्रतिष्ठित व्यापारी,शेतकरी दादाजी गोंगले यांच्या कडे 17 वर्षापासून रापती राहून उदरनिर्वाह करणाऱ्या गरीब कुटुंबातील दोन्ही मुली तरूणीणी जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर पोलीस भरतीत यश मिळवले आहे. हे सिद्ध केले की प्रतिकूल परिस्थिती यशात अडथळा ठरत नाही.
फुटाणा मोकासा छोट्याशा गावखेड्यातील अत्यंत गरीब कुटुंबातील दोघी बहिणी जिद्दीच्या जोरावर नुकतीच पोलिस दलात भरती झाली. आरती कचरू शिंदे पदवीचे शिक्षण व दुसरी बहिण श्यामकला कचरू शिंदे पदवीचे शिक्षण त्या दोघीचे नाव आहे,
गाव -गणपूर रै ता -चामोर्शी जिल्हा -गडचिरोली
दोघींचं प्राथमिक शिक्षण फुटाणा या गावात नंतर 8 वी 10 वी नांदगांव नंतर गोंडपिंपरी पोलिस भरती साठी गडचिरोली रूम करून अभ्यास ग्राउंड ची तयारी
दोघीचेही घरच्या गरिबीमुळे पुढील शिक्षण थांबणार होते. मात्र,आरती व श्यामकला दोघीची जिद्द व कष्ट करण्याची तयारी पाहून वडीलांनी शेती 3 एकर असून सुध्दा वडील फुटाणा मोकासा या गावात दादाजी गोंगले यांच्या कडे रापती वडील कचरू शिंदे 17 वर्षापासून आहेत. आई रुखमाबाई मुलीच्या शिक्षणासाठी त्यांनी कधी कमीपणा पडू दिली नाही.
दोघी बहिणी कुटुंबाला प्राधान्य देत पोलिसात भरती होण्याचा निर्णय घेतला. गडचिरोलीत भरतीत उभे राहून भरतीचा प्रयत्न केला. यंदा 2024-2025 नुकत्याच झालेल्या गडचिरोली पोलिस भरतीत प्रयत्न केला आणि अखेर त्यात यश मिळाले.
सख्ख्या बहिणींच्या जिद्दीची कथा…. दोघी झाल्या पोलीस दलात भरती
थोरल्या बहिणीच्या पावलावर पाऊल ठेवत आरती व आरती
श्यामकला ने ही पोलीस दलात दाखल होण्यासाठी प्रयत्न सुरू केले. त्यांच्या या प्रयत्नांना यश आले आणि गडचिरोली पोलीस भरतीत दोघींचीही पोलीस शिपाई पदासाठी निवड झाली. भारतीय संस्कृतीमध्ये वंश चालवण्यासाठी आज ही मुलगा हवा अशा मानसिकतेचे अनेक उदाहरण आहेत. मुलाच्या जन्मासाठी अट्टाहास धरला जातो. मात्र वृत्तीला छेद देत मुली ही वंशाचे नाव रोशन करू शकतात याच उत्तम उदाहरण म्हणजे आरती कचरू शिंदे ,श्यामकला कचरू शिंदे
गाव -गणपूर रै ता -चामोर्शी जिल्हा -गडचिरोली कुटुंबातील 2 मुलींना पोलीस सेवेत दाखल झाल्याने मुलीही मुलांपेक्षा कमी नाही हे दाखवून दिले आहे.
कचरू शिंदे यांनी कधीही मुलींचा अव्हेर केला नाही. त्यांच्यावर राग काढला नाही किंवा घरच्या परिस्थितीमुळे त्यांचा कामासाठी आधारही घेतला नाही. या दोन्ही मुलींना पदवी पर्यंतच शिक्षण दिलं आणि दोन्ही मूली पोलिसात जाण्याचा निर्णय घेतला.