Home आपला जिल्हा Breaking News उद्या 10 एप्रिल राजगड येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर

उद्या 10 एप्रिल राजगड येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर

257

वन-स्टॉप महसुली सेवा मेळावा : १५ पेक्षा अधिक सेवा एका छताखाली
ग्रामीण भागातील नागरिकांना शासकीय सेवा सुलभ, पारदर्शक व जलद पद्धतीने उपलब्ध करून देण्यासाठी शासनाच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान (टप्पा-९) अंतर्गत राजगड येथे शिबिर तहसील कार्यालय मूल यांच्या पुढाकारातून १० एप्रिल रोजी सकाळी १० वाजल्यापासून राजगड येथील ठिकाण : स्व बाबुजी पाटील हायस्कूल राजगड आयोजित केले आहे.

नागरिकांना विविध महसुली कामांसाठी वेगवेगळ्या कार्यालयांच्या फेऱ्या मारण्याची गरज भासणार नाही.


एकाच ठिकाणी सर्व सेवा उपलब्ध करून देत, नागरिकांच्या तक्रारींचा त्वरित निपटारा करण्यावर प्रशासनाचा भर राहणार आहे. विशेषतः ग्रामीण व दुर्गम भागातील नागरिकांना याचा मोठा लाभ होणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. शिबिरात १५ पेक्षा अधिक महत्त्वाच्या महसुली सेवा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. प्रलंबित फेरफार प्रकरणे निकाली काढणे, ७/१२ उताऱ्यातील चुका दुरुस्ती, डिजिटल स्वाक्षरीचे ७/१२ व ८ अ उतारे वितरण, उत्पन्न, रहिवासी व जातीचे प्रमाणपत्र, तसेच नॉन-क्रिमीलेअर प्रमाणपत्र देणे या सेवा प्रमुख राहणार आहेत. याशिवाय, अकृषक संदर्भातील मार्गदर्शन व त्रुटी दुरुस्ती, नवीन सनद प्रक्रियेबाबत सविस्तर माहिती, विद्यार्थ्यासाठी आवश्यक दाखले वाटप, विविध सामाजिक अर्थसाहाय्य योजनांचे प्रस्ताव मंजूर करणे यांसारख्या सेवा नागरिकांना या शिबिरातून मिळणार आहेत.