Home आपला जिल्हा Breaking News लाडक्या बहिणींनो ई-केवायसीत दुरुस्ती करा@ आज शेवटचा दिवस

लाडक्या बहिणींनो ई-केवायसीत दुरुस्ती करा@ आज शेवटचा दिवस

200

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेंतर्गत लाभ घेण्यासाठी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करताना झालेल्या त्रुटीमुळे अपात्र ठरलेल्या महिलांना दुरुस्तीची संधी देण्यात आली आहे. त्यानुसार महिलांना ३१ मार्चपर्यंत पुन्हा एकदा ई- केवायसी दुरुस्ती करता येणार आहे. ३१ मार्च हा शेवटचा दिवस असून, महिलांनी ई-केवायसी करून घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेंतर्गत ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत ज्या लाभार्थी महिलांनी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केली आहे त्यामध्ये लाभार्थीच्या कुटुंबातील कोणताही सदस्य नियमित, कायमस्वरूपी किवा कंत्राटी स्वरूपात सरकारी विभाग, शासकीय उपक्रम, महामंडळ, भारत सरकार अथवा राज्य सरकारच्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये कार्यरत नसणे, तसेच कोणताही सेवानिवृत्तीनंतर सदस्य निवृत्तीवेतन घेत अपात्र महिलांनी केवायसी करण्याचे केले आवाहन ज्या महिलांची ई-केवायसी प्रक्रिया चुकीच्या पर्यायामुळे अपूर्ण राहिली किंवा त्या अपात्र ठरल्या आहेत, त्यांनी आपली माहिती काळजीपूर्वक तपासून दुरुस्त करणे आवश्यक आहे. राज्य शासनाच्या निर्देशानुसार ई-केवायसी दुरुस्तीसाठी ३१ मार्च ही अंतिम संधी आहे. या तारखेनंतर कोणत्याही परिस्थितीत ई-केवायसी प्रक्रियेत सुधारणा करण्याची मुभा दिली जाणार नाही. त्यामुळे महिलांनी मुदतीत ई- केवायसी दुरुस्ती करून योजनेचा लाभ निश्चित करावा, असे आवाहन केले आहे.
नसणे या अटीबाबत चुकीचा पर्याय निवडल्याचे निदर्शनास आले होते. या कारणामुळे अनेक महिला अपात्र ठरल्या होत्या. या पार्श्वभूमीवर शासनाने अशा अपात्र ठरलेल्या महिलांना पुन्हा एकदा संधी देण्याचा निर्णय घेतला.