एकाच खोलीत राहणाऱ्या (रूममेंट्स) चार मैत्रिणींनी रचला इतिहास
——————————————–
2024 – 25 या सत्रातील पोलीस शिपाई भरतीत निवड झाल्याबद्दल तुमचे मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन..!
कु.प्रतीक्षा संजय सोनुले (रा.केळझर)
कु.पूजा रमेश मांदाडे (रा. बेंबाळ)
कु. सुप्रिया राजू बालुगवार (रा. बेंबाळ)
कु. प्रियाली प्रकाश वासेकर (रा. सिंतळा)
चंद्रपूर जिल्ह्याचे पोलीस बनायचे स्वप्न मनात बाळगून ग्रामीण भागातून जिल्ह्याच्या ठिकाणी रूम करून राहण्यास आले असता,,पोलीसमध्ये भरती होण्यासाठी आवश्यक बाबी म्हणजे मैदानी चाचणी व लेखी परीक्षा असते यांची पुरेपूर माहिती मिळवत त्यांनी आपल्या कोचच्या व शिक्षकांच्या मार्गदर्शनानुसार आपण सर्वोत्तम गुण मिळवून लवकरात लवकर कसे यश मिळवता येईल यासाठी योग्य असा नियोजन करून त्याचा सातत्यपूर्ण पाठपुरावा करत आपल्या हिम्मतीच्या व सहनशक्तीच्या जोरावर विश्वास ठेवून निरंतर अभ्यास व सराव करून ते सक्षम बनले.
त्यांनी या भरतीत आपला फॉर्म चंद्रपूर येथेच भरून भरती प्रक्रियेला सामोरे जातांना पहिल्यांदा मैदानी चाचणीमध्ये मेरिट गुण मिळवत लेखी परीक्षेला पात्र झाल्यानंतर पुन्हा शेवटचा टप्पा गाठण्यासाठी जिद्दीने अभ्यास केला.
सर्वांनीच आपल्या कुवतीनुसार लेखी परीक्षा उत्तमरित्या उत्तीर्ण होऊन आपले मैदानी चाचणी + लेखी परिक्षा यांची सांगड घालत मेरिटमध्ये येऊन आपला विजय सुनिश्चित केला.
अशाप्रकारे त्यांनी आपल्या मेहनतीला दुजोरा देत आपल्या मार्गदर्शक व्यक्तींचे व आईवडिलांचे स्वप्न पूर्ण केलेत व आपल्या नावाची छाप चंद्रपूर पोलीस भरतीत पाडली.
यांच्यासारखे यांनीच…
मूल तालुक्यातील या चार मुली
एकाच भरतीत,,, एकाच रूममधील,,,एकाच जिल्ह्यात,,,एकच अभ्यासिकात अभ्यास करणाऱ्या,,,एकाच वेळी पोलीस भरतीमध्ये,,,भरती होणारे पोलीस भरतीच्या इतिहासातील आगळावेगळा पराक्रम करणारे हेच असतील याबद्दल मात्र शंका नाही.
तुमच्या मेहनतीचे आणि चिकाटीचे हे फळ आहे. तुमच्या या उत्तुंग यशाबद्दल खूप खूप शुभेच्छा, आयुष्यात अशीच प्रगती करत राहावे.
नवीन जबाबदारीसाठी आणि पुढील वाटचालीसाठी खूप खूप अभिनंदन!
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
अभिवादक :- गौरव रमेश मांदाडे, बेंबाळ








