Home आपला जिल्हा Breaking News सीईटी व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या परीक्षेसाठी प्रथमच दोन वेळा प्रवेशपत्र

सीईटी व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या परीक्षेसाठी प्रथमच दोन वेळा प्रवेशपत्र

114

मुंबई : राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे (सीईटी सेल) घेण्यात येणाऱ्या १७ व्यावसायिक अभ्यासक्रमांची प्रवेश परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना यंदा प्रथमच दोन प्रवेश पत्रे देण्यात येणार आहेत. यामध्ये एक अस्थायी आणि दुसरे अंतिम असेल. यातील अस्थायी पत्र परीक्षेच्या ८ ते १० दिवस आधी दिले जाईल. त्यातून विद्यार्थ्याला प्रवेश परीक्षा कोणत्या शहरात आहे, याची माहिती समजू शकेल.
यंदा सीईटी सेलकडून पदवी पूर्व आणि पदव्युत्तर पदवी अशा १७ व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या सीईटी परीक्षा २४ मार्च ते १६ मेदरम्यान घेतल्या जाणार आहेत. एखाद्या भागात परीक्षा केंद्राच्या अनुपलब्धतेमुळे विद्यार्थ्याला अन्य जिल्ह्यातील परीक्षा केंद्र दिले जाते.


परीक्षा केंद्राची माहिती अंतिम प्रवेशपत्रात विद्यार्थ्याला प्रवेश परीक्षेच्या तीन ते चार दिवस आधी अंतिम प्रवेशपत्र त्याच्या लॉग-इनमध्ये उपलब्ध करून दिले जाईल.
या पत्रात प्रत्यक्ष केंद्र, केंद्राचा कोड, नाव व पत्ता याची माहिती दिली जाईल, असे सीईटी सेलने सांगितले.
परीक्षा केंद्र भरताना पसंतीक्रमानुसार चार जिल्हे भरावे लागतात. यंदापासून सीईटी सेल त्या-त्या प्रवेश परीक्षेच्या ८ ते १० दिवस आधी अस्थायी प्रवेशपत्र विद्यार्थ्याच्या लॉग-इनमध्ये ऑनलाइन उपलब्ध करणार आहे. या पत्रामध्ये विद्यार्थ्यांना आधीच परीक्षा केंद्र कोणत्या शहरात अथवा जिल्ह्यात येणार आहे, हे समजू शकेल.