Home आपला जिल्हा Breaking News नवभारत विद्यालय मुल येथे प्राचार्य अशोक झाडे सर यांचा निरोप व सत्कार...

नवभारत विद्यालय मुल येथे प्राचार्य अशोक झाडे सर यांचा निरोप व सत्कार समारंभ संपन्न

92

नवभारत विद्यालय तथा कनिष्ठ विज्ञान महाविद्यालय, एम सी व्ही सी मूल येथे दि.31/01/2026 ला नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाल्यामुळे निरोप व सत्कार समारंभ पार पडला.कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्यालयाचे पर्यवेक्षक सौ वर्षा भांडारकर,आजचे सत्कारमूर्ती प्राचार्य श्री. ए एच झाडे सर ,प्रमुख अतिथी म्हणून प्रा.महेश पानसे सर,प्रा.के.जे वासाडे सर,श्री जी आर चौधरी सर, प्रा . काटकर श्री उपस्थित होते.
सुरुवातीला क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व स्व. वि तु नागपुरे साहेब यांच्या प्रतिमेचे पूजन तथा द्वीपप्रज्वलन करण्यात आले. त्यानंतर कार्यक्रमाचे प्रास्ताविक कु . दिपा गोंगल मॅडम यांनी केले.याप्रसंगी प्रा महेश पानसे , प्रा काटकर प्रा. वासाडे सर, प्रा . कामडी सर,जी आर चौधरी सर, कु. प्रतिमा उमक मॅडम,एन एस माथनकर, विजय निखारे,प्रा.बोलीवार, प्रा. उगेमुगे मॅडम यांनी आपले विचार व्यक्त केले.तेव्हा मान्यवर मंडळींच्या हस्ते सत्कारमूर्ती प्राचार्य श्री अशोक झाडे सर आणि सौ. स्वाती झाडे यांचा सन्मानचिन्ह,शाल,श्रीफळ, पुष्पगुच्छ, साडी, ड्रेस भेट देऊन विद्यालयाच्या वतीने सत्कार करण्यात आला. आजचे सत्कारमूर्ती प्राचार्य श्री अशोक झाडे सर यांनी सेवाकालावधीतील जीवनावर प्रकाश टाकला.”शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्रात तेवढ्याच प्रामाणिकपणे काम करण्याचा प्रयत्न केला. विद्यार्थ्यांवर सुसंस्कार करण्याची संधी मला मिळाली, याबद्दल समाधानी आहे.’’ अध्यक्षीय भाषण पर्यवेक्षक सौ. वर्षा भांडारकर यांनी केले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्री. टी जी निमसरकर सर आणि उपस्थितांचे आभार कु. माधुरी तलांडे यांनी मानले.यावेळी विद्यालयाचे सर्व प्राध्यापक, शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.🙏🙏🙏