Home आपला जिल्हा Breaking News दिव्यांग यु.डी.आय.डी प्रमाणपत्र सादर करणेबाबत – नायब तहसिलदार चिडे यांचे आव्हान

दिव्यांग यु.डी.आय.डी प्रमाणपत्र सादर करणेबाबत – नायब तहसिलदार चिडे यांचे आव्हान

93

मुल – तालुक्यातील विशेष सहाय्य योजनेतील दिव्यांग लाभार्थ्यांना संदर्भीय शासन. निर्णय क्र.01 अन्वये मासिक मानधन 2500/- रु देण्यास मान्यता देण्यात आलेली आहे. त्यानुसार ज्या दिव्यांग लाभार्थ्यांकडे यु. डी. आय. डी. कार्ड व वैध प्रमाणपत्र असेल तरच त्यांची माहिती पोर्टलवर अद्यावत करुन लाभ देण्यात यावा व ज्या लाभार्थ्यांकडे यु. डी. आय. डी. कार्ड व वैध प्रमाणपत्र नसल्यास लाभ बंद करण्यात यावा असे निर्देश संदर्भिय क्र.02 अन्वये प्राप्त झालेले आहेत.
त्याअनुषंगाने मुल तालुक्यातील सर्व दिव्यांग लाभार्थ्यांना सुचना / आवाहन करण्यात येते की, दिव्यांग (अपंगत्व) असल्याचे प्रमाणपत्र व यु.डी. आय. डी. कार्ड ची झेरॉक्स प्रत मोबाईल नंबरसह दिनांक 15/02/2026 पर्यत संबंधित ग्राम महसुल अधिकारी (तलाठी) यांचेकडे तसेच तहसिल कार्यालय, मुल येथील संगायो शाखेत न चुकता सादर करावे. जेणेकरुन दिव्यांग लाभार्थ्यांना DBT पोर्टलव्दारे दिव्यांग बाबतची माहिती अपडेट करण्यात येऊन 2500 /- रु मानधन जमा करण्यात येईल व योजनेचा लाभ सुरु राहील.
तथापि ज्या लाभार्थ्यांनी दिव्यांग असल्याचे प्रमाणपत्र व यु. डी. आय. डी कार्ड विहित मुदतीचे आत सादर न केल्याने योजनेतुन नाव कमी करण्यात येऊन लाभ बंद करण्यात येईल व सदरहू बाबीस लाभार्थ्यास जबाबदार धरण्यात येईल याची मुल तालुक्यातील दिव्यांग लाभार्थ्यांनी नोद घ्यावी. असे आदेश प्रसिद्ध केलेल्या जाहीरनाम्यात
नायब तहसिलदार, (संगायो)
तहसील कार्यालय,मूल यांनी कळविले आहे.