आधार संबंधित कामासाठी नागरिकांना भादुर्णी गावातच आधार शिबीरांचे आयोजन करण्यात आलेले आहे.नवीन आधार नोंदणी,बायोमॅटिक दुरूस्ती,मोबाईल लिंकिग,व केवायसी ज्येष्ठ नागरीकांचे पेन्शन,रेशन कार्ड तसेच शासकीय योजनांचे लाभ रखडू नये,लाडकी बहिण योजना व अतिवृष्ठी नुकसानभरपाईसाठी आवश्यक केवायसीसाठी ग्रामीण,गरीब,दिव्यांग व नागरीकांना 25 ते 30 किलोमीटर प्रवास वाचणार आहे. त्याकरीता आता गावातच शिबीरांचा लाभ घ्यावा.असे प्रतिपादन मशाखेत्री यांनी कळविले आहे.
ग्रामपंचायत भादुर्णा तह मूल जिल्हा चंद्रपूर येथे 2 दिवसाीय आधार शिबिर दिनांक 19 व 20 जानेवारी रोज सोमवारला 12 वाजता चालू होणार आहे तरी नागरीकांनी येतांना ओळखीचा पुरावा व पत्याचा पुरावा रेशनकार्ड,जुना आधार कार्ड, मोबाईल नंबर घेवून यावे..
ग्रामपंचायत कोसंबी येथे 21 व 22 जानेवारी 2025रोज बुधवार गुरूवार 12 वाजता चालू होणार आहे तरी नागरीकांनी येतांना ओळखीचा पुरावा व पत्याचा पुरावा रेशनकार्ड,जुना आधार कार्ड, मोबाईल नंबर घेवून यावे..
ग्रामपंचायत काटवन येथे 23 जानेवारी शुक्रवार ला शुक्रवार रोज 12 वाजता चालू होणार आहे तरी नागरीकांनी येतांना ओळखीचा पुरावा व पत्याचा पुरावा रेशनकार्ड,जुना आधार कार्ड, मोबाईल नंबर घेवून यावे..
‘आधार’ला दहा वर्षे झाली, अपडेट केले का?
ज्या नागरिकांना आधार कार्ड काढून १० वर्षे पूर्ण झालीत त्यांना आधार अपडेट करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. योजना सुरु झाली तेव्हा कोणतीही कागदपत्रे ज्यांनी दिले नाहीत त्यांना आता ‘आधार’मध्ये असलेले नाव, जन्मतारीख, वय, लिंग, मोबाइल क्रमांक, ई- मेल, रहिवासी पत्ता आदी अपडेट करावे लागेल. तसेच डोळ्यांची बुबुळे, बोटांचे ठसे, चेहऱ्याचे सुधारित छायाचित्र द्यावे लागणार आहे.
१० वर्षांनंतर आधार अपडेट करणे आवश्यक
आधार कार्ड काढल्यानंतर दर पाच ते दहा वर्षांनी अपडेट करावे लागते. विशेषतः घराचा पत्ता बदललेला असेल
तर किंवा लहान मुलांचे आधार कार्ड काढल्यानंतर त्यांना पाच वर्षांनी अपडेट करणे आवश्यक आहे. बोटांचे ठसे, चेहऱ्याचे छायाचित्र बदललेला मोबाइल क्रमांक आदींमध्ये बदल होतो.
आधार अपडेट कोठे करावे?
जिल्ह्यातील प्रत्येक आधार केंद्रामध्ये आधार कार्ड अपडेट केले जाते. लहान मुलांचे कार्ड अपडेट मोफत केले जाते. बँक, पोस्ट कार्यालय तसेच इतर विविध ठिकाणीही आधार
केंद्रातून आधार आधार कार्ड अपडेट करता येते.
कागदपत्रे काय
आवश्यक?
जन्म प्रमाणपत्र, मार्क
शीट्स, ओळखीचा पुरावा, रेशन कार्ड, मतदार ओळखपत्र, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, पासपोर्ट भाटी
पहिल्यांदाच आधार
काढताय?
पहिल्यांदा आधार कार्ड काढत असाल तर संबंधित केंद्राकडे आवश्यक कागदपत्रे
लागतात. मुलाचे आधार कार्ड
काढायचे असेल तर वडिलांचे आधार कार्ड, रहिवासी दाखला, शाळेचे प्रमाणपत्र आवश्यक आहे.
बोटांचे ठसे, पत्ता अद्ययावतीकरण गरजेचे दर काही वर्षांनी आधार अपडेट करणे गरजेचे आहे. विशेषतः घराचा पत्ता बदलतो, मात्र आधार कार्डवर जुनाच ठेवला जातो किंवा बोटांचे ठसे, चेहऱ्यातील बदल यामुळे अद्ययावतीकरण करणे गरजेचे
आहे.
मुलाचे आधार अपडेट कसे कराल?
भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने मुलांच्या आधार कार्डाबाबत मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. प्राधिकरणाने जारी केलेल्या नवीन मार्गदर्शक तत्त्वांनुसार, ५ ते १५ वर्षे वयोगटातील मुलांच्या आधार डेटामध्ये बायोमेट्रिक तपशील अपडेट करणे बंधनकारक आहे आणि तसे करण्याची प्रक्रिया निःशुल्क आहे.
यूआयडीच्या नव्या नियमानुसार आधार अपडेट करणे बंधनकारक आहे. प्रत्येकाने पाच ते दहा वर्षांनी ते अपडेट करावे. विशेषतः मोबाइल नंबर, घरचा पत्ता, चेहऱ्यातील बदल, बोटांचे ठसे यामुळे आधार कार्ड वेळोवेळी अपडेट करणे गरजेचे आहे.
आधार शिबीरांचे आयोजन करण्यात आलेला आहे तरी नागरीकांचा संधीचा लाभ घ्यावा…
ग्रामपंचायत भादुर्णा येथे 2 दिवसाीय आधार शिबिर दिनांक 19 व 20 जानेवारी रोज सोमवार,मंगळवार
ग्रामपंचायत कोसंबी येथे 21 व 22 जानेवारी 2025रोज बुधवार गुरूवार 12 वाजता चालू होणार आहे
ग्रामपंचायत काटवन येथे 23 जानेवारी शुक्रवार ला शुक्रवार रोज 12 वाजता चालू होणार आहे
वरील तारखेला आधार शिबीरांचे आयोजन करण्यात आलेला आहे तरी नागरीकांनी संधीचा लाभ घ्यावा…






