Home आपला जिल्हा Breaking News मूल मध्ये लाखांचा किरणा मालासह पिकअप चोरीचा गुन्हा उघड आरोपींना अटक

मूल मध्ये लाखांचा किरणा मालासह पिकअप चोरीचा गुन्हा उघड आरोपींना अटक

82

मूलमध्ये १३.८० लाखांचा किरणा मालासह पिकअप चोरीचा गुन्हा उघड; ४ दिवसांत ३ आरोपींना अटक

मूल | प्रतिनिधी – मूल शहरातून किरणा सामानाने भरलेला पिकअप वाहन चोरी करणाऱ्या टोळीचा मूल पोलिसांनी अवघ्या चार दिवसांत पर्दाफाश करीत मोठी कामगिरी बजावली आहे. या कारवाईत १३ लाख ८० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून मध्यप्रदेशातील तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे.

फिर्यादी सुरेश नरसीदास सारडा (वय ६३, व्यवसाय – किरणा व्यापारी, मूल) यांनी १० सप्टेंबर २०२४ रोजी मूल पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यांच्या मालकीचा MH-34 BZ 4411 क्रमांकाचा पिकअप वाहनात किराणा माल भरून दुकानांमध्ये वितरित करण्यासाठी नेण्यात आला होता. मात्र १० सप्टेंबर रोजी सकाळी वाहन पार्क केलेल्या ठिकाणी आढळून आले नाही. तपासाअंती हा पिकअप व त्यातील किराणा माल चोरीस गेल्याचे स्पष्ट झाले. या प्रकरणी मूल पोलीस ठाण्यात अप. क्र. ०९/२०२४ भा.दं.वि. कलम ३०३(२), ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

गुन्हा ४ दिवसांत उलगडा “— मूल पोलिसांची कौशल्यपूर्ण कामगिरी : पोलीस अधीक्षक, अपर पोलीस अधीक्षक व उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली मूल पोलीस स्टेशनच्या डी.बी. पथकाने तांत्रिक विश्लेषण व गोपनीय माहितीच्या आधारे तपास सुरू केला. अवघ्या चार दिवसांत मध्यप्रदेशातील छिंदवाडा जिल्ह्यातून तीन आरोपींना अटक करण्यात आली.

अटक आरोपी:अनुज बब्बू सोनी (वय २२),विजय छिपाल परतेती (वय २३),अंकित मुरड धुर्वे (वय २२) (सर्व रा. छिंदवाडा, मध्यप्रदेश)

मोठा मुद्देमाल जप्त: पोलिसांनी आरोपींकडून चोरी गेलेले पिकअप वाहन MH-34 BZ 4411 (किंमत ₹10,00,000)150 बॉक्स किराणा साहित्य (₹2,87,082) इतर किराणा माल गुन्ह्यात वापरलेले MH-49 BZ 0236 क्रमांकाचे वाहन असा एकूण ₹22,09,522/- रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

व्यापाऱ्यांकडून पोलिसांचे कौतुक या तात्काळ व प्रभावी कारवाईबद्दल फिर्यादी व्यापारी सुरेश सारडा यांनी मूल पोलीस, जिल्हा पोलीस प्रशासन आणि तपास पथकाचे जाहीर आभार मानले आहेत. व्यापारी वर्गातही समाधान व्यक्त करण्यात येत आहे.सदर गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सुबोध वंजारी (पो.स्टे. मूल) यांच्या नेतृत्वाखाली सुरू असून आरोपींना न्यायालयात हजर करून पोलीस कोठडी रिमांड घेण्यात आली आहे.