Home आपला जिल्हा Breaking News मूलच्या रुग्णालयात साप आढळल्यामुळे …………….

मूलच्या रुग्णालयात साप आढळल्यामुळे …………….

92

मूल: मूल येथील उपजिल्हा रुग्णालयाची इमारत भव्य आहे. परंतु रुग्ण उपचार पद्धती मात्र कमी असल्याच्या असंख्य तक्रारी नागरिकांच्या आहेत. ज्या रुग्णांचे तज्ज्ञ डॉक्टर पाहिजे ते रुग्णालयात नाही. म्हणून अनेक रुग्णांना रेफर टू चंद्रपूर ही एकच पद्धत मूलच्या उपजिल्हा रुग्णालयात सद्यस्थितीत सुरु आहे अशी अवस्था रुग्णालयाची झाली असताना आज दि. २६ डिसेंबर २०२५ रोजी
दुपारी सुमारे एक वाजता उपजिल्हा रुग्णालयातील आयसीयू ऑपरेशन रूममध्ये दरवाज्याच्या फटीतून साप जात असल्याचे एका सतर्क कर्मचाऱ्याच्या निदर्शनास आले. तातडीने ही माहिती मूल येथील संजीवन पर्यावरण संस्थेच्या सर्पमित्रांना देण्यात आली असता सर्पमित्र उमेश झिरे यांनी तत्काळ रुग्णालयात दाखल होत ऑपरेशन रूमची पाहणी केली. तपासणीदरम्यान ॲल्युमिनियमच्या दरवाज्याच्या फ्रेममध्ये लपलेला साप आढळून आला. सर्पमित्रांनी
सुरक्षित पद्धतीने सापाला बाहेर काढले असता तो विषारी कोब्रा साप असल्याचे स्पष्ट झाले. वेळीच दाखवलेल्या कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे आणि सर्पमित्रांच्या तातडीच्या कारवाईमुळे मोठा धोका टळला. असे असले तरी असंख्य रुग्ण आपला जीव वाचविण्यासाठी रुग्णालयात जातात परंतु उपजिल्हा रुग्णालयाची अवस्था जर विषारी साप निघण्या पर्यंत जर असेल तर मात्र रुग्णालय प्रशासन जबाबदार नाही काय, रुग्णालयाकडे खरच लक्ष आहे काय, असा प्रश्न नागरिकांनी केला आहे. रुग्णालयातील एका कर्मचाऱ्यांच्या नजरेस हा साप दिसला म्हणून बरे वागले. अन्यथा आपरेशन करणाऱ्या डॉक्टरांचा जीव आणि आय. सी यू. मध्ये भारती असणाऱ्या रुग्णांचा जीव धोक्यातच होता. तात्काळ सर्पमित्र उमेश झिरे यांनी नाग सापाला पकडल्याने त्यांना धन्यवाद दिले. तरी देखील उपजिल्हा रुग्णालय परिसरात विषारी साप निघाल्याची एकच खळबळ, माजली असून रुग्णालय प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचे बोलले जात आहे. (ता.प्र.)