Home आपला जिल्हा Breaking News चिरोलीत उमेदची सामुदायिक मूल्यांकन कार्यशाळा

चिरोलीत उमेदची सामुदायिक मूल्यांकन कार्यशाळा

49

उमेद (महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान) मध्ये निवड झालेल्या सामुदायिक व्यक्तींची मूल्यांकन कार्यशाळा २८ ऑक्टोबर रोजी चिरोली येथील ‘यशस्वी महिला प्रभाग संघ कार्यालयात उत्साहात पार पडली.या कार्यशाळेलाउमेद अभियानाचे जिल्हा अभियान व्यवस्थापक प्रवीण भांडारकर, तालुका अभियान व्यवस्थापक नितीन वाघमारे, प्रकल्प मार्गदर्शक प्रसन्ना, क्षमता बांधणी अधिकारी संतोष वाढई, प्रभाग समन्वयक मनीष मोहुर्ले हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते. तसेचयशस्वी महिला प्रभाग संघाच्या अध्यक्ष विशाखा गणवीर, सचिव सोनी उराडे, कोषाध्यक्ष पायल देवईकर, जानाळा येथील सरपंच दर्शना किन्नाके, चिरोली सरपंच मीनल लेणगुरे, तालुका संसाधन व्यक्ती सोनी मोहुर्ले आदी मान्यवर मंचावर विराजमान होते.
याकार्यशाळेदरम्यानसामुदायिक व्यक्तींच्या कामाचे मूल्यमापनकरण्यातआले.
गावपातळीवर महिलांनी सामाजिक उपक्रमांमध्ये घेतलेली पुढाकार, ग्रामपंचायत योजनांमध्ये त्यांचा सहभाग आणि शासकीय योजनांचा लाभ कसा मिळवायचा, यावर मार्गदर्शन करण्यात आले. उपस्थित मान्यवरांनी उमेदच्या माध्यमातून महिलांच्या आर्थिक आणि सामाजिक प्रगतीसाठी सातत्याने कार्य करण्याचे आवाहन केले.
या कार्यशाळेला चिचाळा व केळझर येथील यशस्वी महिला प्रभाग संघातील कॅडर सदस्य तसेच ग्राम संघ पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमामुळे ग्रामीण महिलांमध्ये केवळ आर्थिक साक्षरता नव्हे तर सामाजिक जबाबदारीची जाणीवही वाढीस लागली असून, ग्रामविकासाच्या प्रक्रियेत महिला वर्गाचे नेतृत्व दृढ होत असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.