Home आपला जिल्हा Breaking News विद्यार्थ्यांसाठी @महाडीबीटी पोर्टलवर शिष्यवृत्ती अर्ज करा

विद्यार्थ्यांसाठी @महाडीबीटी पोर्टलवर शिष्यवृत्ती अर्ज करा

63

अनु. जाती, इमाव, विमाप्र व विजाभज प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी समाज कल्याण विभाग व बहुजन कल्याण विभागांतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध शिष्यवृत्ती योजनांसाठी अर्ज प्रक्रिया महाडीबीटी ऑनलाइन प्रणालीवर सुरू झाली आहे.
सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण यांनी दिलेल्या माहितीनुसार, शैक्षणिक सत्र २०२५-२६ मध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी तसेच २०२४ २५ सत्रातील प्रलंबित विद्यार्थ्यांसाठी ३० जून २०१५ पासून महाडीबीटी पोर्टल खुले करण्यात आले आहे. सर्व महाविद्यालयांच्या प्राचार्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शनकरून
https://mahadbtmahait.gov.in/H home / Index या संकेतस्थळावर अर्ज भरण्याची सूचना देण्यात आली आहे.