Home आपला जिल्हा Breaking News चांदापुर फाटा@भीषण अपघातात एका तरुणाचा मृत्यू

चांदापुर फाटा@भीषण अपघातात एका तरुणाचा मृत्यू

81

मूल : मुल तालुक्यातील चांदापुर फाटा चौकाजवळ झालेल्या भीषण अपघातात एका तरुणाचा मृत्यू झाला आहे. ही घटना २६ ऑक्टोबर रोजी दुपारी घडली. कार्तीक निलकंठ सुजागडे (२५) रा. जामतुकुम, ता. पोभुर्णा, जि. चंद्रपूर असे मृतकाचे नाव आहे. कार्तीक निलकंठ सुजागडे भाऊबीजेच्या ओवाळणीसाठी आपल्या बहिणीकडे गट्टगुळा ता. चामोर्शी, जि. गडचिरोली येथे गेले होते. ओवाळणी आटोपून व जेवण करून ते आपल्या गावाकडे मोटारसायकल क्र. एम. एच. ३४ सी. एफ. ६३६६ ने परत येत होते. दुपारच्या सुमारास ते चांदापुर फाटा चौकाजवळ पोहोचले असता विरुद्ध दिशेने येणाऱ्या स्विफ्ट डिझायर कार क्रमांक सीजी ०८ बीए ६८३८ ने भरधाव वेगात व निष्काळजीपणे वाहन चालवत त्यांच्या मोटारसायकलला जबर धडक दिली. या धडकेत कार्तीक सुजागडे गंभीर जखमी झाले. घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी तत्काळ त्यांना रस्त्याच्या कडेला नेले आणि चांदापुर येथील सरपंच यांच्यामदतीने खाजगी ऑटोने मुल येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला.
कार या अपघातात चालकाच्या एका निष्काळजीपणामुळे तरुणाचे आयुष्य अकाली संपले असून मृताचे नातेवाइक मनोज वामनराव भुरसे यांनी मुल पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी स्विफ्ट डिझायर कार चालकाविरुद्ध गुन्हा नोंदविला असून पुढील तपास मुल चे पोलीस निरीक्षक विजय राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली पोहवा तनु रायपुरे करीत आहे.