CTET Exam : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळासह इतर मंडळांच्या शाळांमध्ये शिक्षकांच्या नियुक्तीसाठी सीटीईटी परीक्षा घेतली जाते. ही परीक्षा ८ फेब्रुवारी २०२६ रोजी देशभरातील १३२ शहरांमध्ये घेण्यात आहे.
शिक्षकांच्या नियुक्तीसाठी पात्रता परीक्षा घेतली जाणारी सेंट्रल टीचर्स एलिजिबिलिटी टेस्ट दरवर्षी घेतल्या जाते. डिसेंबर २०२४ आणि जुलै २०२४ मध्ये
या परीक्षांचे आयोजन करण्यात आले होते. एकूण २० भाषांमध्ये ही परीक्षा घेतली जाईल. या परीक्षेची नोंदणी सुरू केली जाणार आहे.
तेथून विद्यार्थ्यांना परीक्षेला बसण्यासाठी अर्ज करावे लागतील. या परीक्षेअंतर्गत पेपर घेतले जातात. पेपर-१ हा पहिली ते चौथीच्या वर्गांना शिकवू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी, तर पेपर-२ हा इयत्ता सहावी ते वर्गांना शिकवू इच्छिणाऱ्यांसाठी आहे. परीक्षेत १५० बहुपर्यायी प्रश्न विचारले जातील आणि उत्तरांना नकारात्मक गुणदान केले जाणार नाही. परीक्षार्थ्यांना कोणताही एक पेपर किंवा दोन्ही पेपर देण्याची सुविधा उपलब्ध असते.
Post Views: 84