Home आपला जिल्हा Breaking News तालुका क्रीडा संकुल, मूल येथे गोंडवाना विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन वेटलिफ्टिंग, पॉवरलिफ्टिंग आणि बेस्ट...

तालुका क्रीडा संकुल, मूल येथे गोंडवाना विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन वेटलिफ्टिंग, पॉवरलिफ्टिंग आणि बेस्ट फिजिक्स क्रीडा स्पर्धेचे आयोजन

61

मूल :
दिनांक 9 ऑक्टोबर, गुरुवार रोजी तालुका क्रीडा संकुल, मूल येथे गोंडवाना विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन वेटलिफ्टिंग, पॉवरलिफ्टिंग आणि बेस्ट फिजिक्स क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेचे आयोजन ग्रुप ऑफ फिट लिफ्टरचे संचालक व एन.आय.एस. कोच करण सुरेश कोसरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.
गोंडवाना विद्यापीठ अंतर्गत चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यातील कर्मवीर महाविद्यालय, मूल, डॉ. खत्री महाविद्यालय, तुकूम, डॉ. शांताराम पोटदुखे महाविद्यालय, सरदार पटेल महाविद्यालय, चिंतामणी महाविद्यालय, घुघूस, आनंद निकेतन महाविद्यालय, वरोरा यांसह तीस ते चाळीस महाविद्यालयांतील खेळाडूंनी या स्पर्धेत सहभाग नोंदविला.
स्पर्धेचे उद्घाटन गोंडवाना विद्यापीठाच्या शारीरिक शिक्षण विभागाच्या संचालिका डॉ. अनिता लोखंडे यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी श्री. अखिलभाऊ गांगरेडिवार (अध्यक्ष, कृषी उत्पन्न बाजार समिती, मूल) होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून श्री. धर्मेंद्रभाऊ सूत्रपवार आणि श्री. राकेशभाऊ सातपैसे उपस्थित होते.