दिनांक ११/१२०२५रोज शनिवार विवेकानं वरिष्ठ महाविद्यालय बेंबाळ या विद्यमाने महात्मा गांधी जयंतीचे औचित्य साधून दिनांक ७ ऑक्टो २०२५ ला विद्यार्थ्यांच्या स्थानिक महाविद्यालयात “स्वातंत्र्य चळवळीत महात्मा गांधी यांचे योगदान याविषयी”आंतर महाविद्यालयीन निबंध स्पर्धा २०२५”चे* आयोजन करण्यात आलेले होते.
त्या स्पर्धेमध्ये कु. रीना काटवले ह्या विद्यार्थिनीने प्रथम बक्षीस मिळविले, द्वितीय बक्षिस कु. समृद्धी शेडमाके आणि तृतीय बक्षिस कु. प्राजक्ता गोंगले आणि प्रोत्साहन पर बक्षीस समीर यारेवार इ. विद्यार्थ्यांनी प्राविण्य मिळविले.
या स्पर्धेचे बक्षीस वितरण कार्यक्रम आज दिनांक ११/१०/२०२५ रोज शनिवार ला घेण्यात आले .
या कार्यक्रमाप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून श्री. पी. डी. पाल सर( वि. वि. बेंबाळ), उद्घाटक म्हणून प्रा. यु. टी. आरेकर (आनंद महा. बेंबाळ), प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. राहुल नरहरशेट्टीवार सर (जनसेवा महा. नांदगाव) उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. सुभाष पि. सोनुले सर , संचालन प्रा. सांगपाल ए. रामटेके सर आणि आभार प्रदर्शन प्रा. प्रफुलचंद के. भसारकर सर तसेच शिक्षकेत्तर कर्मचारी व महाविद्यालयाचे सर्व विद्यार्थी उपस्थित होते.
Home आपला जिल्हा Breaking News विवेकानंद वरिष्ठ महाविद्यालय, बेंबाळ येथे आंतर महाविद्यालयीन निबंध स्पर्धा संपन्न






