Home आपला जिल्हा Breaking News 3जण ठार मूल मारोडा मार्गावरील घटना@2 दुचाकीची समोरासमोर धडक

3जण ठार मूल मारोडा मार्गावरील घटना@2 दुचाकीची समोरासमोर धडक

156

तिन जण ठार मूल मारोडा मार्गावरील घटना@2 दुचाकीची समोरासमोर धडक मूल (प्रतिनिधी) : 
मूल तालुक्यातील मारोडा येथील यश शेंडे आणि वडील देविदास शेंडे हे दोघेही वडील आणि मुलगा शेती संदर्भातील ऑनलाईनचे काम करण्यासाठी मूल येथे दुचाकीने आले होते, काम पुर्ण करुन ते दुचाकीने परत जात होते, दरम्यान भादुर्णा येथील वासुदेव सहारे हे मूलच्या दिशेने येत असतांना मूल मारोडा मार्गावरील बल्की देव जवळ दुचाकीचा समोरासमोर धडक बसल्याने यश शेंडे, देविदास शेंडे रा. मारोडा हे घटनास्थळी ठार झाले तर वासुदेव सहारे रा. भादुर्णा याना उपचारार्थ उपजिल्हा रुग्णालयात नेत असतांना वाटेतच मृत्यु झाला. मूल पोलीस घटनास्थळी दाखल होवुन पंचनामा केला. 

शेतीसंदर्भातील ऑनलाईनेच काम करून परत जात असतांना दोन दुचाकीची समोरासमोरील धडक बसल्याने 2 जण जागीच ठार झाल्याची घटना मूल मारोडा मार्गावरील बल्की देव जवळ बुधवारी दुपारी 1 वाजता दरम्यान घडली. यश शेंडे, देविदास शेंडे रा. मारोडा हे घटनास्थळी ठार झाले तर वासुदेव सहारे रा. भादुर्णा याना उपचारार्थ उपजिल्हा रुग्णालयात नेत असतांना वाटेतच मृत्यु झाला.

पुढील तपास पोलीस निरीक्षक विजय राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली सुरुआहे.