Home आपला जिल्हा Breaking News मूल @प्रभागातील आरक्षणाने सुरू झाल्या इच्छुकांच्या गाठीभेटी राजकीय पक्षांचे कार्यकर्ते लागले कामाला

मूल @प्रभागातील आरक्षणाने सुरू झाल्या इच्छुकांच्या गाठीभेटी राजकीय पक्षांचे कार्यकर्ते लागले कामाला

110

मूलमध्ये नगराध्यक्षपदी ‘मी’ नाही तर आता ‘सौभाग्यवती’; गुडघ्याला बाशिंग बांधून बसणाऱ्या अनेकांचा भ्रमनिरास
मूल नगरपरीषद नगराध्यक्षपद ओबीसी महीला प्रवर्गातील महिलेसाठी राखीव झाल्याने गुडघ्याला बाशिंग बांधून बसणाऱ्यांचा चांगलाच भ्रमनिरास झाला आहे. त्यामुळे आता मूल नगरपरीशद नगराध्यक्षपदी ‘मी’ नाही तर ‘सौभाग्यवती’ असा सूर गवसला जाणार आहे.
प्रस्थापित नेतेमंडळींना आपल्या सौभाग्यवतींना रणांगणात उतरवण्याची तयारी सुरू करावी लागणार आहे. महिला आरक्षणामुळे वातावरण पूर्ण ढवळून गेले असून, राजकीय डावपेच सुरू झाले आहेत… मूल हे तालुक्याचे मुख्यालय आहे. येथीत नगराध्यक्षपदासाठी अनेकांनी देव पाण्यात घातले आहेत. सोमवारी महिलेसाठी येथील नगराध्यक्षपद आरक्षित झाले. आणि अनेकांचा भ्रमनिरास झाला. अनेकांचे नगराध्यक्ष होण्याचे स्वप्न धुळीस मिळाले आहे. आता मी नाही तर पत्नीस नगराध्यक्ष करण्यासाठी यातील अनेकजण सरसावणार आहेत. त्यामुळे राजकीय वर्तुळात घमासान पाहायला मिळणार आहे. नगराध्यक्षपदाचे आरक्षण निश्चित झाल्यानंतर आता नगराध्यक्षपदासाठी इच्छुक असलेल्या ओबीसी महीला प्रवर्गातील उमेदवारांची दांडी गत झाल्याने आपल्या सौभाग्यवर्तीना कशी संधी मिळेल? यासाठी फिल्डिंग लावण्यासाठी आता धडपड करावी लागणार आहे.
बुधवारी नगरसेवक पदाचे आरक्षण जाहीर झाल्यानंतर खऱ्या अर्थानि निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरुवात होणार आहे. तोपर्यंत ‘वेट अँड वॉच’च्या भूमिकेत सर्वपक्षाची नेतेमंडळी राहणार आहेत. मे उमेदवारांनी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली होती. परंतु, महिला आरक्षण पडल्याने आत्ता इच्छुकांची भाऊगर्दी कमी होणार आहे. काही इच्छुकांनी तर सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या प्रचार यंत्रणा दबक्या आवाजात मतदारांशी संपर्क साधण्यास सुरवात केली आहे.
तालुक्याचे ठिकाण असल्यामुळे तालुक्यातील अनेक नेते मूलचे राजकारण आपल्याच हातात राहावे यासाठी स्वतःचा गट मजबूत करण्यावर भर देत असतात. मूल शहरासाठी येणारा नगरविकासचा निधी व येथील कामे मिळवण्यासाठी मूल शहरातील राजकारण आपल्या हातात ठेवण्याचा प्रयत्न करीत गट बांधणी करीत आहेत. त्यामुळे मूलचे थेट नगराध्यक्षपदाची निवडणूक यावेळी जोरदार होण्याची शक्यता आहे. नगराध्यक्ष आणि नगरसेवक होण्यासाठी भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस दोन्ही गट, काँग्रेस व अपक्ष अशी इच्छुकांची मोठी संख्या वाढणार आहे.
नगराध्यक्षपदाचे ओबीसी महिला आरक्षण निश्चित झाल्यानंतर आत्ता प्रभाग रचनेत आरक्षण आज पडले

नगर परिषद   न.प. आरक्षण सोडत

नगर परिषद  मूल न.प. आरक्षण सोडत 8 ऑक्टो. दुपारी 12 वाजता (पिठासीन अधिकारी म्हणून उपविभागीय अधिकारी मूल, अजय चरडे)

 मूल या नगर परिषदांमधील नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग, महिला (अनुसूचित जाती महिला, अनुसूचित जमाती महिला व नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गातील महिला व सर्वसाधारण महिलांसह) यांचे आरक्षण सोडत पध्दतीने निश्चित  आहे. यापूर्वी नगराध्यक्ष पदासाठी आरक्षण सोडत काढण्यात आली होती त्यात नगराध्यक्ष पदी ओबीसी प्रवर्गातील महिलेसाठी हे पद आरक्षीत जाहीर करण्यात आले. यावेळी नागरिकांसह विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

या आरक्षणानंतर अनेकांनी त्या अनुषंगाने आपले गणिते जुळविणे सुरू केले आहे.काहींचा हिरमोड झाला असून काहींना संधी चालून आल्याचेही बोलल्या जात आहे. याअनुषंगाने त्यांच्या हालचाली अधिकच वाढल्याचे दिसून येत आहे.

प्रभाग १. अनुसूचित जमाती महिला. सर्वसाधारण पुरुष

 प्रभाग २. नामाप्र.महिला ,ओबीसी सर्वसाधारण पुरुष

 प्रभाग ३. ओबीसी आरक्षण महिला, सर्वसाधारण पुरुष 

प्रभाग ४. ओबीसी पुरुष, सर्वसाधारण महिला 

प्रभाग ५. ओबीसी महिला, सर्वसाधारण पुरुष

 प्रभाग ६. ओबीसी पुरुष, सर्वसाधारण महिला

 प्रभाग ७. एसटी.पुरुष, सर्वसाधारण महिला

 प्रभाग ८. एससी. पुरुष, सर्वसाधारण पुरुष 

 प्रभाग९. एससी.महिला, सर्वसाधारण पुरुष

 प्रभाग १०. एससी महिला ,सर्वसाधारण पुरुष