Home आपला जिल्हा Breaking News ‘एमपीएससी’च्या परीक्षांचे नवीन वेळापत्रक जाहीर! कोणती परीक्षा कधी होणार

‘एमपीएससी’च्या परीक्षांचे नवीन वेळापत्रक जाहीर! कोणती परीक्षा कधी होणार

89

पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने परीक्षांचे सुधारित वेळापत्रक जाहीर केले आहे. यानुसार नियोजित २८ सप्टेंबर रोजी होणारी महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा राज्यातील पूरस्थितीमुळे पुढे ढकलली होती. ही परीक्षा रविवारी, ९ नोव्हेंबर २०१५ रोजी घेण्यात येणार
आहे.
याचबरोबर ९ नोव्हेंबर रोजी
होणारी महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा रविवार, दि. २१ डिसेंबर २०२५ रोजी घेण्यात येणार आहे. तसेच वेळापत्रकानुसार महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा दि. ३० नोव्हेंबर २०२५ रोजी घेण्यात येणार होती. आयोगाचे वेळापत्रक प्रसिद्ध झाल्यानंतर संघ लोकसेवा आयोगाने सदर परीक्षा रविवार, दि. ४ जानेवारी २०२६ रोजी घेण्याचे
जाहीर केले आहे.

MPSC Exam 2025 revised Schedule: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने परीक्षांच्या तारखांमध्ये बदल केला आहे. राज्यसेवा पूर्व परीक्षा आता ९ नोव्हेंबर २०२५ रोजी होईल. गट ब ची परीक्षा २१ डिसेंबर २०२५ रोजी तर गट क ची परीक्षा ४ जानेवारी २०२६ रोजी घेण्यात येईल. या बदलांमुळे विद्यार्थ्यांना सोयीचे होणार आहे. आयोगाने नवीन वेळापत्रक जाहीर केले आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने विविध स्पर्धा परीक्षांच्या वेळापत्रकात आज, सोमवारी (६ ऑक्टोबर २०२५) बदल केला आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी राज्यातील पूरस्थितीमुळे २८ सप्टेंबर रोजी होणारी ‘महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित पूर्व परीक्षा २०२५’ पुढे ढकलली होती. परीक्षेच्या काही तास अगोदर आयोगाने याचे परिपत्रक काढले होते. परीक्षा देणाऱ्या उमेदवारांकडून वारंवार मागणी केली जात होती पण आयोगाने त्यावर काहीही निर्णय घेतला नव्हता. अखेर राज्यभरातील लोकप्रतिनिधींनीही या प्रकरणात लक्ष घातल्यानंतर अखेर आयोगाने ही परीक्षा पुढे ढकलली होती. आता राज्यसेवा पूर्व परीक्षा येत्या ९ डिसेंबर रोजी होणार आहे.

यापूर्वीच्या वेळापत्रकानुसार ९ डिसेंबर २०२५ रोजी ‘महाराष्ट्र गट ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२५’ आयोजित करण्यात आली होती. आता ९ डिसेंबर रोजी राज्यसेवा पूर्व परीक्षा आयोजित केल्याने गट ब ची परीक्षेची तारीख बदलण्यात आली आहे. आता नवीन वेळापत्रकानुसार गट ब ची परीक्षा रविवार, २१ डिसेंबर २०२५ रोजी होईल. तर आजच महाराष्ट्र गट क सेवा परीक्षेची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या जाहिरातीनुसार ‘महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२५’ रविवारी, ४ जानेवारी २०२६ रोजी घेण्यात येणार आहे.