चंद्रपूर : आदिवासी विकास विभागाच्या वतीने ‘राणी दुर्गावती आदिवासी महिला सक्षमीकरण’ ही योजना सुरू केली. व्यवसायासाठी केंद्रवर्ती योजनेमधून लाभार्थ्याने मागणी केल्यास वैयक्तिक योजनेसाठी ५० हजार रुपये व सामुहिक योजनेसाठी ७ लाख ५० हजार रुपये या मर्यादेत अटी व शर्तींच्या अधिन राहून शासनामार्फत अनुदान दिले जाते. महिला व महिला बचत गटांनाएकात्मिक आदिवासी प्रकल्पकार्यालामार्फत लाभार्थी हिस्सा देण्यात आहे. त्यामुळे पात्र महिलांनीलाभार्थी हिस्सा भरण्याकरीता कार्यालयास अर्ज सादर करावा, असे आवाहन प्रकल्प अधिकारी विकास राचेलवार यांनी केले आहे.






