Home आपला जिल्हा Breaking News दुचाकीवर वाघाची झडप, महिला गंभीर जखमी…

दुचाकीवर वाघाची झडप, महिला गंभीर जखमी…

121

मूल- चंद्रपूर मार्गावरील केसलाघाट जवळील घटना
मूल: महादवाडीवरून मुलाला घेऊन दुचाकीने जात असताना मुख्य मार्ग ओलांडण्यासाठी रस्त्याच्या कडेला दबा धरून असलेल्या वाघाने दुचाकीवर झडप घातली. त्यामुळे पत्नी गंभीरजखमी झाली. तर पतीला व मुलाला किरकोळ जखम झाली. ही घटना मूल-चंद्रपूर महामार्गावरील केसलाघाट जवळील ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या बफरझोन क्षेत्र कक्ष क्रमांक ३५५ जवळशनिवारी सकाळी १० वाजता दरम्यान घडली.विकास जानकीराम कुळमेथे (२७) व एक वर्षाचा मुलगा किरकोळ जखमी आहे तर पत्नी अंजनी विकास कुळमेथे (२६) गंभीर जखमी आहे. मुलाची प्रकृती बरी नसल्याने त्याला महादवाडी येथून मूल येथेउपचारार्थ दवाखान्यातदुचाकीनेपती-पत्नीघेऊन जातहोते.दरम्यान,केसलाघाटजवळदोनरस्तापट्टेदार वाघओलांडण्यासाठी रस्त्याच्या कडेलादबा धरून होते. दुचाकी जवळ येताच एका वाघाने दुचाकीवर झडप घातली. त्यामुळे पत्नीला गंभीर दुखापत झाली.संतोष रावत यांनी स्वतःच्या गाडीत बसवून तिघांनाही रुग्णालयात भरती केले.