आनंदी नैताम,सोमनाथ प्रकल्प. वय ७० वर्ष.१९५६ ला कुष्ठरोगाचे निदान झाल्यामुळे परिवाराने सर्वच संबंध तोडले, कोणाच्या तरी परिचयातून आनंदवनात दाखल झाली, उपचार घेतले, विवाह झाला, काहीवर्षात पुढे सोमनाथला आली.. आपलं जीवन नव्याने सुरू केलं, बाबांनी स्वतःच्या पायावर उभ राहायला, नवनिर्मितीचा संस्कार दिलाच होता, त्यामुळे वेदना सोबत होत्या पण तरीही शेती, आणि इतर पडेल ती कामे करण्यात पुढाकाराने रमली… घरातून बाहेर पडल्यानंतर कधीच तिला कोणी भेटायला आले नाहीत याचे दुःख कुष्ठरोगाच्या वेदनेपेक्षा जास्त होते.. काळ लोटला, नवीन परिवार आनंदात सुरू झाला, तिच्यासारखेच समदुःखी महिला, पुरुष एकमेकांचे भाऊबंद झालेत.. अशा अनेक नवदुर्गा आपले आभाळभर दुःख मागे टाकून नव्याने उभ्या राहिल्या… कोणतेही दुःख धरून न बसता या अव्याहत पने निवडलेली कामं करत राहिल्या व संसार ही सुखाने केले..अशा नवदुर्गा सोमनाथच्या हिरव्या रंगात आनंदाने रमल्या आहेत.






