Home आपला जिल्हा Breaking News अतिवृष्टीच्या इशाऱ्यानंतर ‘एमपीएससी’ने २८ सप्टेंबरची परीक्षा पुढे ढकलली; सुधारित तारीख जाहीर

अतिवृष्टीच्या इशाऱ्यानंतर ‘एमपीएससी’ने २८ सप्टेंबरची परीक्षा पुढे ढकलली; सुधारित तारीख जाहीर

107

MPSC Preliminary Exam 2025 Postponed: गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात मुसळधार पाऊस पडत आहे. तसेच पुढील काही दिवसही मुसळधार पावसाचा अंदाज वर्तविला आहे. त्यामुळे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने २८ सप्टेंबर रोजी होणारी राज्यसेवा पूर्व परीक्षा पुढे ढकलली आहे.
आता हा पेपर ९ नोव्हेंबर २०२५ रोजी होणार आहे. यामुळे अतिवृष्टीबाधित
जिल्ह्यांतील उमेदवारांना दिलासा मिळाला आहे. सुरुवातीला आयोगाने परीक्षा पुढे ढकलण्यास नकार दर्शविला होता. अखेर या निर्णयाला जास्त विरोध झाल्यानंतर एमपीएससीने निर्णय घेतला आहे.
महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा ही रविवारी (२८ सप्टेंबर २०२५) रोजी नियोजित होती. महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू आहे. त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांचे आणि सामान्यांचे मोठे नुकसान झाले आहे. बरेच महामार्ग बंद आहेत. अशात परीक्षा केंद्रावर जाण्यासाठी उमेदवारांना अनेक अडचणी येणार होत्या. त्यामुळे उमेदवारांनी ही परीक्षा पुढे जावी, ही मागणी केली महाराष्ट्र लोकसेवा आयोग काय म्हणाले?
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची २८ सप्टेंबर, २०२५ रोजी होणारी परीक्षा राज्यातील ३७ जिल्हाकेंद्रांवरील ५२४ उपकेंद्रांवर उपकेंद्रांवर घेण्यात येणार होती. पण राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये निर्माण झालेल्या पूरजन्य परिस्थितीमुळे अनेक जिल्ह्यातील विविध गांवाचा, तालुक्यांचा एकमेकांशी संपर्क तुटलेला आहे. तसेच राज्यातील हवामान खात्याने पुढील काही दिवसांत अतिवृष्टीचा इशारा दिला असून अशा परिस्थितीत कोणताही उमेदवार परीक्षेपासुन वंचित राहू नये यासाठी शासनाने पत्राद्वारे केलेल्या विनंतीनुसार ही परीक्षा नियोजित तारखेस न घेता पुढे ढकलण्याचा आयोगाने निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा २०२५, दिनांक २८ सप्टेंबर, २०२५ ऐवजी सुधारित दिनांकास म्हणजेच दिनांक ०९ नोव्हेंबर, २०२५ रोजी घेण्यात येईल. या परीक्षेच्या दिनांकातील बदलामुळे दिनांक ०९ नोव्हेंबर, २०२५ रोजी घेण्यात येणारी पूर्वनियोजित महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२५ चा
सुधारित दिनांक शुद्धिपत्रकाद्वारे स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येईल.