Home आपला जिल्हा Breaking News मा. सा. कन्नमवार औधोगिक प्रशिक्षण संस्था मुल येथे पंडित दीनदयाल उपाध्याय जयंती...

मा. सा. कन्नमवार औधोगिक प्रशिक्षण संस्था मुल येथे पंडित दीनदयाल उपाध्याय जयंती साजरी

77

मा सा कन्नमवार औधोगिक प्रशिक्षण संस्था मुल येथे पंडित दीनदयाल उपाध्याय जयंती साजरी

पंडित दीनदयालजींचे विचार अंगीकारा-प्रा किरण कापगते यांचे विद्यार्थ्यांना आवाहन

मुल येथील मा सा कन्नमवार औधोगिक प्रशिक्षण संस्थेत पंडित दीनदयाल उपाध्याय यांची जयंती एकात्मता मानवता दिवस म्हणून साजरी करण्यात आली, या प्रसंगी विशेष अतिथी म्हणून प्रा डॉ सौ किरणताई कापगते यांची उपस्थिती होती, कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे प्राचार्य अजय बोकारे होते, गट निदेशक श्री पडिशालवार सर, पिपरे सर यांची विशेष उपस्थिती होती, पंडित उपाध्याय यांनी मांडलेले एकात्म मानववाद हे तत्वज्ञान भारतीय समाज, संस्कृती, स्वदेशीचा आग्रह , धर्मप्रधान राज्यव्यवस्था व अर्थकारणाला कशी दिशा देणारे होते याविषयी विस्तृत माहिती प्रा किरणताई कापगते यांनी आपल्या संबोधनात दिली, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दीप्ती भदे मॅडम यांनी केले तर यमनुरवार मॅडम यांनी उपस्थितांचे आभार मानले, कार्यक्रमाला सर्व कर्मचारी आणि प्रशिक्षणार्थी उपस्थित होते