Home आपला जिल्हा Breaking News उत्साह आणि भक्तीतून आदिशक्तीला वंदन ,जल्लोषात केले स्वागत

उत्साह आणि भक्तीतून आदिशक्तीला वंदन ,जल्लोषात केले स्वागत

68

नवरात्रीचा शुभारंभ होताच शहरात उत्साह, भक्ती आणि आनंदाची लाट उसळली आहे. आदिशक्तीचे स्वागत मूल शहरकरांनी जल्लोषात केले. कुठे देखणी महालक्ष्मी, कुठे शौर्य गाजवणारी दुर्गा, तर कुठे आक्रमक महाकाली अशा विविध रूपात मातेच्या प्रतिमांची प्राणप्रतिष्ठा सोमवारी करण्यात आली.

शहरातील सार्वजनिक दुर्गा उत्सव मंडळांनी देवीच्या प्रतिष्ठापनेसाठी भव्य आरास केली आहे. सोमवारी आदिशक्तींच्या मिरवणुकी दिवसभर वाजतगाजत निघाल्या. ढोल-ताशांच्या गजरात फटाक्यांच्या आतषबाजीत, गुलालांच्या उधळणीत आणि ‘जय माता दी’च्या घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता.

टॅली, ट्रक तसेच कारवरून सजवलेल्या प्रतिमांना प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी रवाना झाल्या. मूर्तिकारांनी घडवलेल्या देखण्या मूर्तीचे सौंदर्य पाहण्यासाठी महिलांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती. अनेक महिलांनी या प्रतिमांना कॅमेऱ्यात टिपत भक्तिभावाने दर्शन घेतले.

घटस्थापनेपासून ते विजयादशमी पर्यंत होणाऱ्या भक्तिभावपूर्ण वातावरणात साजरा होणाऱ्या शारदीय नवरात्रानिमित्त आज दिनांक 22 सप्टेंबर 2025 रोजी, सायंकाळी 6 वाजता , दरार दुर्गा मंडळ सोमनाथ रोड मूल दुर्गामातेच्या मूर्तीचे आगमन व प्रतिष्ठापना होत असून , या मंगलमय पवित्र कार्यक्रमास भक्तांनी बहुसंख्येने उपस्थित रहावे ही विनंती 🙏🏻🙏🏻🙏🏻

आपले विनीत:
श्री प्रशांतभाऊ समर्थ
संस्थापक अध्यक्ष व
दरार दुर्गा मंडळ पदाधिकारी व सदस्यगण 🙏🏻🙏🏻🙏🏻