Home आपला जिल्हा Breaking News मूल येथे ‘दीक्षारंभ’ कार्यक्रमास उत्साहात सुरवात

मूल येथे ‘दीक्षारंभ’ कार्यक्रमास उत्साहात सुरवात

52

कृषी महाविद्यालय, मूल येथे शैक्षणिक सत्र २०२५-२६ मध्ये प्रथम वर्षाला प्रवेशित विद्यार्थ्यांसाठी सहाव्या अधिष्ठाता समितीच्या शिफारसीनुसार ‘दीक्षारंभ’ या विशेष अभ्याक्रमाला सुरवात  करण्यात आली. या विशेष अभ्यासक्रमांतर्गत विद्यार्थ्यांचे महाविद्यालयीन जीवनात स्वागत करताना त्यांना कौशल्य आधारित शिक्षण, व्यवसायाभिमुख शिक्षण व प्रशिक्षण, व्यक्तिमत्व विकास व त्यांच्या सुप्त गुणांना वाव मिळण्यासाठी ह्या अभ्यासक्रमाचा समावेश करण्यात आला आहे. सदर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान कृषी  महाविद्यालय, मूल चे सहयोगी अधिष्ठाता *डॉ. व्ही. जी. अतकरे* यांनी भूषवले.

कार्यक्रमाच्या सुरुवातीस *डॉ. एस. वाय. कडू*  शिक्षण प्रभारी यांनी महाविद्यालयाची माहिती देऊन दीक्षारंभ या विशेष अभ्यासक्रमाचे प्रास्ताविक केले. त्यानंतर *डॉ. एस. आर. मुन्नरवार*, सहायक प्राध्यापक यांनी विद्यार्थ्यांना विविध स्पर्धा परीक्षा, युवा महोत्सव, अविष्कार, क्रीडा स्पर्धा आणि वार्षिक स्नेहसंमेलन इत्यादी विषयी माहिती देऊन त्यांचा लाभ करून घ्यावा असे आवाहन विद्यार्थ्यांना केले.

*डॉ. व्ही. एस. साखरकर* आणि *डॉ. विशाखा डोंगरे *यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात कृषी शिक्षणाचे महत्त्व, विद्यार्थ्यांसमोरील संधी आणि जबाबदाऱ्या यावर प्रकाश टाकला तसेच* *डॉ. ए. जे. इंगोले,  डॉ. ए. जे. डेरे, डॉ. बी. ए. ठाकरे*आणि *डॉ. पी. एस. घुबे*  यांनी विद्यार्थ्यांसोबत हितगुज करून विषयाबद्दल मार्गदर्शन केले.

प्राध्यापक *डॉ. आर. पी. गजभिये* यांनी नवीन शैक्षणिक धोरणाची गरज व महत्व सांगून त्याचा उपयोग कसा करता येईल हे सांगितले. तसेच त्यांनी विद्यार्थांना नामांकित कृषी शिक्षण संस्थांमध्ये शिकण्याचे महत्व पटवून सांगितले.

अध्यक्षीय भाषणादरम्यान कृषी  महाविद्यालय, मूल चे सहयोगी अधिष्ठाता *डॉ. व्ही. जी. अतकरे* यांनी नवप्रवेशित विद्यार्थ्यांचे अभिनंदन करताना  विशेष मार्गदर्शन केले  व त्यामध्ये त्यांनी  END या शब्दाचा अर्थ शेवट नसून Effort Never Dies म्हणजेच प्रयत्न कधीच संपत नसतात असे सांगितले  तसेच दर्जेदार शिक्षणासाठी  सर्वतोपरी सहकार्याचे आश्वासन दिले. डॉ. ए. जे. इंगोले यांनी आभारप्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता केली.