Home आपला जिल्हा Breaking News एआय तंत्रज्ञानाच्या माध्यमातून इंग्रजी भाषेचे शिक्षण द्यावे : डॉ. शीला नरवाडे

एआय तंत्रज्ञानाच्या माध्यमातून इंग्रजी भाषेचे शिक्षण द्यावे : डॉ. शीला नरवाडे

57

मूल : कर्मवीर महाविद्यालय, मूल येथील इंग्रजी विभागात ‘लर्निंग  इंग्लीश टू एआय’ या  विषयावर  अतिथी
व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. या व्याख्यानात अतिथी वक्त्या म्हणून डॉ. शीला नारवडे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. अनीता डी. वाळके होत्या. इंग्रजी विभागाचे प्रा. डॉ. गणेश गायकवाड, डॉ. जी. एस. आगलावे तसेच आयक्यूएसीसमन्वयक प्रा. गजानन घुमडे उपस्थित होते. डॉ. नरवाडे यांनी कृत्रिम बुद्धिमत्ता च्या विविध उदाहरणांचा आधार घेत इंग्रजी भाषेच्या अध्ययनात होणाऱ्या फायद्यांवर प्रकाश टाकला. दैनंदिन जीवनातील संवाद विद्यार्थ्यांसाठी अधिक सोपा करण्यामध्ये एआयचीमहत्त्वाची भूमिका असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
जगाच्या पटलावरइंग्रजी भाषेचे वाढते महत्त्व कोणीहीनाकारू शकत नाही, असेही त्या म्हणाल्या. तसेचविद्यार्थ्यांचे प्राधान्यक्रम, वेळेचेव्यवस्थापन, सकारात्मकदष्टीकोनाचे महत्त्व अशा जीवनमूल्यांविषयीही त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. जी. एस. आगलावे यांनी केले, तर आभारप्रदर्शन डॉ. जी. जे. गायकवाड यांनी केले.