“नवभारत विद्यालय मुल येथे गुणवंत विद्यार्थ्याचा सत्कार सोहळा संपन्न”

67

🌱🌱🌱🌱🌱
दिनांक 17 मे 2025 ला नवभारत विद्यालय मुल येथे “गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ” विद्यालयाच्या वतीने आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून शिक्षण प्रसारक मंडळ मूल चे अध्यक्ष ॲड. अनिलराव वैरागडे साहेब होते. प्रमुख अतिथी म्हणून विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री अशोक झाडे सर , पर्यवेक्षक सौ. वर्षा भांडारकर मॅडम होत्या
कार्यक्रमाचे अध्यक्ष ॲड. वैरागडे साहेब यांचे स्वागत शाळेचे मुख्याध्यापक श्री अशोक झाडे सर यांनी केले. त्यानंतर शाळेचे मुख्याध्यापक झाडे सर यांनी शिक्षणामुळे आपल्या जीवनाला आकार देण्यासाठी चिंतन, मनन, जिद्ध, चिकाटी, आत्मविश्वास असायला पाहिजे असे प्रास्ताविकेतून सांगितले.तसेच शाळेच्या पर्यवेक्षिका सौ.भांडारकर मॅडमने,व जेष्ठ शिक्षक श्री चौधरी सरांनी आपल्या भाषणातून विद्यार्थांचे अभिनंदन केले..
.विद्यालयातून तसेच संस्थेतून सलोनी भीमदर्शन डोहने 93.80% घेऊन प्रथम आली. द्वितीय अथर्व कृष्णा जिल्हेवार, तृतीय निनाद युवराज गेडाम, सृष्टी महेंद्र लोणबले , यश संजय शेंडे या गुणवंत विद्यार्थ्याचा तसेच पालकांचा सत्कार विद्यालयाच्या वतीने भेटवस्तु, तसेच भांडारकर मॅडमने घरी स्वतः तयार केलेली सुंदर जांभूळ रोप, व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. विद्यार्थ्यांनी व आपले मनोगत व्यक्त केले. तसेच पालकांनी आपले विचार मांडले. संस्थेचे अध्यक्ष ॲड. वैरागडे साहेब यांनी मुलांना चैतन्यशील व्यक्तिमत्वाचे रूप देण्यासाठी सर्वांगीन विकास आवश्यक असतो. गुणवत्तापूर्ण शिक्षणावर भर दिला जाईल. असे प्रतिपादन केले.गुणवंत यशस्वी विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणीक वाटचालीच्या शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निलेश माथनकर यांनी तर आभार प्रदर्शन ताराचंद निमसरकार यांनी मानले. याप्रसंगी शाळेचे ज्येष्ठ शिक्षक गुरुदास चौधरी, विजय मेश्राम, प्रतिमा उमक, विकास मोडक, राजू बोढे, चैतन्य पुप्पलवार, दिपा गोंगल, माधुरी तलांडे, विजय निखारे, भारत सलाम,पूनमचंद वाळके, उदय चौधरी, सुनील चौधरी तसेच सर्व शिक्षक,शिक्षिका, पालक ,शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.