■ दोन दुचाकी चोराच्या एलसीबी ने आवळल्या मुसक्या : ३ दुचाकी जप्त
प्रतिनिधी / चंद्रपूर : स्थानिक गुन्हे शाखेने बिना नंबर ची चोरीची दुचाकी विक्री करणाऱ्या दोन आरोपींना अटक केले. शानु देविदास चिकराम (२०) रा.मु. टेकडी, पो. चिमडा, ता. मुल, जि. चंद्रपुर ह.मु. ब्रम्हानंद मडावी, जिल्हा परीषद शाळे मागे, लोहारा, चंदपुर, नचिकेत चतुर ठाकरे (२२) रा. भेजगाव, ता. मुल, जि. चंद्रपुर असे आरोपीचे नाव असून त्यांच्या कडून १ लाख ७० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आले.
८ मे २०२५ रोजी स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूर येथील पथकातील
पोलीस अधिकारी व अंमलदार मोटार सायकल चोरी करणाऱ्या गुन्हेगारांचा शोध घेत असता बंगाली कॅम्प चौक चंद्रपूर येथे एका इसम विना कागदपत्र व विना नंबर ची मोटार सायकल विक्री करीता ग्राहकाचे शोधात फिरत असल्याचे मिळालेल्या गोपनिय माहितीवरुन सदर ठिकाणी सापळा रचुन आरोपी देविदास चिकराम (२०) रा.मु. टेकडी, पो. चिमडा, ता. मुल, जि. चंद्रपुर ह. मु. ब्रम्हानंद मडावी, जिल्हा परीषद शाळे मागे, लोहारा, . चंदपुर, नचिकेत ‘चतुर’ ठाकरे (२२) रा. भेजगाव, ता. मुल, जि. चंद्रपुर यांना ताब्यात घेवुन कौशल्यपूर्ण तपास करुन त्याचे कडुन वेगवेगळ्या ठिकाणाहुन एकुण ०३ मोटार सायकल तसेच मोपेड गाडी जप्त करुन पोलीस स्टेशन रामनगर तसेच चिमूर येथील एकुण ०३ गुन्हे उघडकीस आणले आहे. त्यांच्या कडुन एकुण १ लाख ७० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आले.
सदर कारवाई पोलीस अधिक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधिक्षक रिना जनबंधु यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांचे नेतृत्वात सहायक पोलीस निरीक्षक दीपक कांक्रेडवार, पोलीस उपनिरीक्षक सुनिल गौरकार, पोहवा नितीन कूरेकर, पोहवा सुरेंद्र महंतो, पोहवा चेतन गज्जलवार, पोअं गोपाल आतकुलवार, पोअं प्रशांत गारघाटे, चापोहवा दिनेश अराडे, चापोअं मिलिंद टेकाम यांनी केले.