नमस्कार शेतकरी बंधूंनो, महाराष्ट्र सरकार आता महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना खरीप आणि रब्बी हंगामासाठी मोफत बियाणे देत आहे. mahadbt biyane anudan yojana हे बियाणे कसे मिळवायचे याबद्दल आपणास माहिती होणार आहे. खरीप हंगामासाठी शासनामार्फत बियाणे वाटप हे जून मध्ये केले जाते आणि रब्बी हंगामासाठी बियाणे वाटप हे सप्टेंबर ऑक्टोबर च्या दरम्यान केले जाते. यासाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया बियाणे वाटप होण्याआधी एक महिना सुरुवात होते.
बियाणे अनुदान योजना पात्रता अर्ज कोठे करणार
बियाणे अनुदान योजना 2024 मिळवण्यासाठी अर्ज करण्यासाठी महाडीबीटी वेबसाईटवर यायचं आहे.
- बियाणे अनुदान योजना मिळवण्यासाठी महाडीबीटी या पोर्टलवर यायचे आहे.
- या पोर्टल वर आल्यानंतर सुरुवातीला तुमची प्रोफाईल बनवावी लागेल ( खाते बनवावे लागेल ).
- खाते बनवताना तुमचे नाव, पॅन कार्ड, बँक पासबुक, आधार कार्ड, आधार कार्ड ला मोबाईल नंबर लिंक हे सर्व लागेल यासोबतच जमिनीचे उतारे सुद्धा लागतील.
- प्रोफाइल बनवल्यानंतर तुम्ही अर्ज करा ऑप्शन निवडा.
- अर्ज करा यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला खाली ” बियाणे अनुदान योजना ” ऑप्शन दिसेल यावर क्लिक करायचं आहे.
- कोणत्या पिकासाठी पाहिजे, तसेच किती पिकासाठी पाहिजे हे एक एक भरायचे आहे.
- एक एक भरल्यानंतर तुम्ही त्याला प्रायोरिटी द्यायची आहे तसेच आवश्यक असणारे पेमेंट 23.60 रुपये त्यामध्ये भरायचे आहे/
- यानंतर तुमचा अर्ज ऑनलाईन कृषी विभाग कडे भरला जाईल.
- एकदा अर्ज भरल्यानंतर काही दिवसातच तुमचे विभागातील कृषी सहाय्यक जे अधिकारी असतील ते तुम्हाला संपर्क करतील किंवा तुम्ही त्यांच्याशी संपर्क करा.
- बियाणे अनुदान पॅकिंग पिशव्या तुम्हाला ग्रामपंचायत मध्ये काही दिवसातच दिले जाईल.