मुल – मुल तालुक्यातील पिपरी दीक्षित येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत दिनांक 26 एप्रिलला शाळा पूर्वतयारी मेळावा क्रमांक एक चे आयोजन करण्यात आले. गावातील दाखलपात्र सजूनधजून आलेल्या बालकांचे शिक्षक आणि पाहुण्यांच्या हस्ते कुमकुमतिलक करण्यात आले तसेच त्यांना पुष्पगुच्छ आणि फुगे देऊन स्वागत करण्यात आले. त्यावेळी बालकांच्या चेहऱ्यावरचा आनंद ओसंडून वाहत होता. मेळाव्यात वेगवेगळे स्टॉल्स लावून बालकांचा कल,आवड ओळखण्याचा प्रयत्न करण्यात आला.
कार्यक्रमाला शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष राजाराम पाल उपाध्यक्ष भाग्यश्री ढोंगे,मुन्ना टेकाम, राकेश मेश्राम, चरणदास देवतळे, प्रवीण पाल,अरुण सोयाम,पल्लवी टेकाम,नीलिमा जुवारे, वेणूताई जुवारे,जयश्री पिपरे, शितल राजगडे,माणिकचंद वाकुडकर, उमेश उरकुडे तसेच बालकांचे पालक,माता पालक गावातील इतर प्रमुख मंडळी उपस्थित होती.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक शंकर चिचघरे मुख्याध्यापक यांनी केले आणि संचालन संगीता दुरुतकर यांनी केले.अशाप्रकारे बालकांचे शाळेतील पहिले पाऊल आनंदात, उत्साहात आणि किलबिलाटात पार पडले.






