Home आपला जिल्हा Breaking News उन्हाचा चटका वाढला; कूलर, पंखे दुरुस्तीच्या दुकानांत गर्दी

उन्हाचा चटका वाढला; कूलर, पंखे दुरुस्तीच्या दुकानांत गर्दी

85

उन्हाचा पारा आता हळूहळू वाढू लागला आहे. त्यामुळे थंड पाण्यासाठी मूल येथील गांधी चैकाच्या बाजूला माठ विक्रीसाठी दाखल झाले आहेत. त्यासोबतच उन्हाची तीव्रता लक्षात घेता, बाजारातील पंखे आणि कूलरच्या दुकानांत ग्राहकांची गर्दी वाढली असल्याचे चित्र दिसून येत आहे.
घरोघरी फ्रीज असले तरी लोकांनी थंड पाण्यासाठी मातीच्या माठालाच पाहिली पसंती दिली आहे. आजघडीला मूल येथील गांधी चैकाच्या बाजूला अनेक ठिकाणी रस्त्याच्या कडेला माठ विक्रेत्यांनी दुकाने थाटली आहेत. काळा आणि लाल रंगाचे मातीचे माठ आणि काही प्रमाणात विविध रंगांचे चिनी मातीचे माठ सुद्धा बाजारात आहेत. 1०० ते २0० रुपये याप्रमाणे माठ विकले जात आहे. माठातील पाणी पिणे हे शरीरासाठी आरोग्यवर्धक आहे, असे काही संशोधनात सिद्ध झाले आहे. त्यामुळे ग्रामीण जनमानसात मातीचा माठ जसा लोकप्रिय असे तसाच मूल येथील शहरी ग्रामीण भागातील लोकांनीही फ्रीजमधील पाणी पिण्यापेक्षा मातीच्या माठातील पाणी पिण्यास पसंती दर्शविली आहे. सध्या मूल व ग्रामीण भागातील उन्हापेक्षा उकाडा जास्त आहे. पर्यायाने उकाड्यातून सुटका करण्यासाठी घरोघरी कूलर आणि पंखे लावले जातात.