Home आपला जिल्हा Breaking News आरटीई प्रवेश, शाळा रजिस्ट्रेशनचे व्हेरिफिकेशन सुरु@RTE 25% Admission Portal

आरटीई प्रवेश, शाळा रजिस्ट्रेशनचे व्हेरिफिकेशन सुरु@RTE 25% Admission Portal

110

Academic Year : 2024-2025 सन 2024-25 या वर्षी करिता RTE 25 % प्रवेश प्रक्रिये अंतर्गत RTE प्रवेश पात्र शाळांचे व्हेरिफिकेशन सोमवार दिनांक 04/03/2023 पासून सुरु होत आहॆ. सर्व आर टी इ 25 टक्के प्रवेश पात्र शाळांनी आपल्या शाळेची आवश्यक सर्व माहिती अचूक व वस्तुनिष्ठ असल्याची खात्री करूनच संकेतस्थळावर अद्ययावत करावी. तसेच शाळांकरिता निर्धारित करुन दिलेल्या वेळेत आपली नोंदणी प्रक्रिया पूर्ण होईल याची दक्षता घ्यावी

आरटीई प्रवेश, शाळा रजिस्ट्रेशनचे शंभर टक्के टार्गेट
बालकांचा मोफत व
सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ नुसार स्थानिक स्वराज्य संस्थांसह खासगी अनुदानित, स्वयंअर्थसाहाय्यित, विनाअनुदानित शाळांमध्ये प्रवेशस्तरावर २५ टक्के जागा वंचित व दुर्बल घटकातील मुलामुलींसाठी राखीव ठेवण्याची तरतूद आहे. त्या अनुषंगाने आरटीई प्रवेशाकरिता या शाळांचे १०० टक्के नोंदणीचे टार्गेट प्राथमिक शिक्षण संचालनालयाने दिले आहे. याकरिता मार्चपर्यंत मुदत देण्यात आली आहे. या मुदतीत आरटीई अंतर्गत पात्र शाळांचे रजिस्ट्रेशन पूर्ण न केल्यास याची शिक्षणाधिकारी प्राथमिक व प्रशासन अधिकारी यांच्या जबाबदारी निश्चित केली जाणार असल्याचे शिक्षण संचालकांनी स्पष्ट केले.
दरवर्षीप्रमाणे शैक्षणिक सत्र २०२४- २५ या वर्षात आरटीई २५ टक्के प्रवेश प्रक्रिया ऑनलाइन राबविण्यात येणार आहे. त्यानुसार जिल्ह्यातील २५ टक्के प्रवेश प्रक्रिया लागू असलेल्या सर्व पात्र शाळांची ऑनलाइन नोंदणी येत्या  मार्च पर्यंत करणे आवश्यक आहे.

कायद्यांतर्गत आता यापुढे विद्यार्थ्यांना त्यांच्या घरापासून एक किमी अंतरावरील शासकीय किंवा अनुदानित शाळांमध्ये प्रवेश दिला जाणार आहे. या पार्श्वभूमीवर प्राथमिक शिक्षण संचालनालयाने पहिल्यांदा शाळांचे रजिस्ट्रेशन करून सर्व शाळांचे मॅपिंग केले जाणार आहे.

प्राथमिक शिक्षण संचालनालयाच्या आदेशानुसार प्राथमिक शिक्षण विभागाने 4 मार्चपासून आरटीई प्रवेश प्रक्रिया लागू असलेल्या शाळांचे ऑनलाइन रजिस्ट्रेशन सुरू आहे.