Home आपला जिल्हा Breaking News आदर्श ग्रा.पं कोसंबी येथे जागतिक महिला दिनानिमित्त

आदर्श ग्रा.पं कोसंबी येथे जागतिक महिला दिनानिमित्त

87

आदर्श ग्रा.पं कोसंबी येथे जागतिक महिला दिनानिमित्त महाकाली ग्रामसंघ कोसंबी च्या वतीने सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.या कार्यक्रमाचे अध्यक्ष रवींद्र किसन कामडी सरपंच ग्रा.पं.कोसंबी, प्रमुख पाहुणे म्हणून उपसरपंच सारिका ईश्वर गेडाम ग्रा.पं.कोसंबी, चंदाताई विनोद कामडी संचालक कृ.ऊ.बा.स.मुल तथा सदस्या ग्रा.पं.कोसंबी, राजेंद्र गिरडकर माजी अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती,शिविल गुरनुले अध्यक्ष गुरुदेव सेवा मंडळ, विवेक सोनुले, महाकाली ग्रामसंघ कोसंबी अध्यक्ष निशा सोनुले, सचिव रोशनी मोहुलै,आयसीआरपी रोशनी सोनुले,बॅऺकसखी ज्ञानेश्वरी चौधरी, कृषीसखी संघप्रिया गेडाम, आणि गावातील सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ बंधू आणि भगिनी उपस्थित होते.सरपंच रवींद्र किसन कामडी यांनी आपल्या भाषणात महीला स्वतः बचत गटांच्या माध्यमातून व्यवसाय करून आत्मनिर्भर झाले पाहिजे असा मोलाचा संदेश दिला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक ज्ञानेश्वरी चौधरी यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुख्याध्यापक प्रशांत गटलेवार यांनी केले तर आभार प्रदर्शन निशा सोनुले यांनी केले.