Home आपला जिल्हा Breaking News बालमेळाव्यात विद्यार्थ्यानी सादर केल्या लक्ष वेधून घेणाऱ्या विज्ञान प्रतिकृती !

बालमेळाव्यात विद्यार्थ्यानी सादर केल्या लक्ष वेधून घेणाऱ्या विज्ञान प्रतिकृती !

115

मूल/ तालुका प्रतिनिधी

विद्यार्थ्यांच्या मनात वैज्ञानिक भावना निर्माण व्हावी या हेतूने सुभाष उच्च प्राथमिक शाळा मूल च्या वतीने विज्ञान मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. या मेळाव्याचे उद्घाटन तालुका कृषी अधिकारी
प्रशांत कासराळे यांच्या हस्ते पार पडले.अध्यक्षस्थानी
शाळा सल्लागार समितीचे अध्यक्ष प्रा. मारोतराव पुल्लावार होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी प्राचार्य
गजानन नागापुरे, अॅड. अनंतजी बल्लेवार, माजी सैनिक मारोतराव कोकाटे, शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष बंडू भाऊ घेर, शाळा सल्लागार समितीचे सदस्य गिताचार्य सुखदेवजी चौथाले, गणेश मांडवकर, पालक शिक्षक संघाच्या उपाध्यक्षा सुवर्णाताई पिपरे, उपाध्यक्ष, सहसचिव निलेश बंडावार, माता पालक संघाच्या उपाध्यक्षा इंदुताई मडावी, सहसचिव उषाताई थोराक,शाळेचे मुख्याध्यापक अविनाश जगताप, पदवीधर शिक्षक राजू गेडाम आदी उपस्थित होते. या बाल विज्ञान मेळाव्यात नर्सरी ते इयत्ता ८ वी च्या ७७ विद्यार्थ्यानी विज्ञान प्रदर्शनात सहभाग घेतला. यात भूकंपापूर्वी धोक्याचे पूर्वसूचना देणारे यंत्र, वॉटर अलार्म, स्मोक अब्सझार्क यंत्र, डिजे निर्मिती, शेती लागवड व सरक्षण , ट्रेन सिक्रुरीटी, शेती सुरक्षा यंत्र ,संगणकाच्या सहाय्याने जोडणारे टॉपोयंत्र आदी मॉडेल सादर करून सर्वाचे लक्ष वेधून घेतले. या मॉडेलचे परीक्षण सचिन बल्लावार, मुकेश मॅकलवार, शैलेश देवाडे यांनी केले.विद्यार्थ्यानी तयार केलेले मॉडेल बघण्यासाठी पालक व नागरिकांनी एकच गर्दी केली होती.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेचे शिक्षक राहुल मुंगमोडे, योगेश पुल्लकवार, बंडु अल्लीवार, रिना मसराम, अजय राऊत, सचिन चिमुरकर, सुकेशीनी रामटेके, निखिता पोहणे, संध्या आभारे, निशा जगताप, चित्रा फलके, संकेत जाधव आदींनी परिश्रम घेतले.