मूल:- येथील दुय्यम निबंधक कार्यालय ब-याच वर्षापासून किरायाच्या इमारतीत प्रशासकीय भवना पासून ब-याचा अंतरावर होते त्यामूळे शेतकरी व ग्राहकांना मोठया प्रमाणात त्रास होत होता. हि बाब ऐरून शासकीय कार्यालय स्थांलांतरण संघर्ष समिती मूल तर्फे वारंवार निवेदन देवून हे कार्यालय प्रशासकीय भवनात स्थालांतरीत करण्याबाबत चर्चा करण्यात आली.
या निवेदनाचा आणि चर्चा अंती हे कार्यालय प्रशासकीय भवनात स्थांलातरीत होणे आवश्यक असल्याची बाब तहसीलदार मूल यांना पटवून देण्यात आली. मात्र त्यावर आवश्यक कार्यवाही होतांना दिसत नव्हती. त्यामूळे हे निवेदन देवून मागणी रेटण्यात आली त्यावर समाधान कारक तोळगा शोधून हे कार्यालय प्रशासकीय भवनात स्थलांतरीत करण्या बाबत सबंधीत दुयम निबंधकांना सूचना देवून हे कार्यालय प्रशासकीय भवनात दाखत होण्याबाबत एका पत्राव्दारे कळविण्यात आले असून लवकरच स्थांलातरीत होणार आहे. .
आपल्या शा.का. स्थलांतरित संघर्ष समितीला मिळलेले एक मोठे यश आहे. असेच मूल तालूका कृषी अधिकारी कार्यालय देखील प्रशासकीय भवनात स्थालांतरीत केले जावे हि मागणी संघर्ष समितीने उच्चलून धरली असून त्यांचाही पाठपूरावा सूरूच आहे असे संघर्ष समिती तर्फे कळविण्यात आलेले आहे.
हे निवेदन देतांना राजू गेडाम,दिपक देशपांडे,प्रकाश चलाख,अमित राउत ,प्रमोद मशाखेत्री, राजेश सोमनकर आदिंची उपस्थीती होती.
Home आपला जिल्हा Breaking News दुय्यम निबंधक कार्यालय प्रशासकीय भवनात स्थालांतरीत करण्यासाठी तहसिलदारांना निवेदन








