Home आपला जिल्हा Breaking News न.प.मूल प्रशासकीय राजवटीत पालिकेत वाढला समस्यांचा डोंगर@निवेदनांना केराची टोपली

न.प.मूल प्रशासकीय राजवटीत पालिकेत वाढला समस्यांचा डोंगर@निवेदनांना केराची टोपली

107

मान्सूनपूर्व विविध कामांचे नियोजन ढेपाळले : शहरातील अस्वच्छता अन् अतिक्रमण कळस गाठण्याच्या उंबरठ्यावर स्थानिक पालिकेत प्रशासकीय राजवट अस्तित्वात आल्यापासून येथील नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. पावसाळ्याच्या पूर्वी नालेसफाई तसेच परिसर स्वच्छतेची कामे होणे अपेक्षित असताना साधा मुहूर्तही ही कामे करण्यासाठी सापडलेला नाही. त्यामुळे नागरिकांना दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे.
 अतिक्रमणाने वेढले आहे. त्यामुळे मुख्य मार्ग अरुंद झाला आहे. शिवाय तेथे नेहमीच वाहतुकीची कोंडी होते. वाढलेले अतिक्रमण एखाद्या मोठ्या अनुचित घटनेला निमंत्रण देत आहे.  पावसाळा तोंडावर असतानाच नालेसफाईची कामे थंडबस्त्यात आहे. वेळीच नाल्यांची सफाई न झाल्यास पावसाचे पाणी नागरिकांच्या घरातच शिरणार आहे. पावसाचे पाणी नागरिकांच्या घरात
शिरल्यास त्यांचे मोठे नुकसान होणार आहे. पालिका प्रशासनाने संभाव्य धोका लक्षात घेता वेळीच उपाय योजना करण्याची गरज आहे.
निवेदनांना केराची टोपली
■ तुंबलेले नाले वेळीच स्वच्छ करण्यात यावे, या मागणीचे निवेदन    जुन्या वस्तीमधील वार्ड क्र 12 मधील          येथील नागरिकांनी पालिका प्रशासनाला निवेदन सादर करून केली आहे; पण निवेदन आणि तक्रारींना केराची टोपली दाखविण्यात धन्यता मानली जात आहे.
या प्रमुख परिसरात वाढले अतिक्रमण
■ मूल शहरातील जुन्या वस्तीमधील वार्ड क्र 12 मधील विश्रामगृह समोरील रोड,
ज्याअर्थी सदर जागेतून सार्वजनिक रस्ता करण्याची वार्ड क्र. १२ (जुना) नागरिकांची मागणी आहे. तसेच सार्वजनिक रस्ता बांधकाम करण्याकरिता नागरीकांच्या मागणीनुसार सार्वजनिक रस्ता म्हणून घोषित करावयाचे आहे. याकरीता सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सदर रस्त्यास मंजुरी प्राप्त असून सदर निधी अखर्चित आहे.
त्याअर्थी, मी मुख्याधिकारी नगर परिषद मूल जि. चंद्रपूर सर्वे नं. ९५३ व ९३८ या जागेतून ४ मीटर रूंदी व ३५ मीटर पूर्व पश्चिम लांबीचा गांधी चौक ते विश्राम गृह रोड पर्यंत सार्वजनिक वहीवाटीसाठी सार्वजनिक रस्ता म्हणून आज दि. ०५.०२.२०२१ रोजी मी माझ्या सही निशी व शिक्का निशी घोषणा अधिसूचित करतो आहे.
वरील अधिसुचनेबाबत कोणत्याही व्यक्तीस आक्षेप असल्यास १ महिन्याच्या आत या कार्यालयात दस्तऐवजासह समक्ष सादर करावा.अशा प्रकारचा दैनिक वृत्तपत्र मध्ये देण्यात आले होते आज 3 वर्ष लोटून सुध्दा रस्ता झालेला नाही तरी न.प.मूल प्रशासन सरळ रस्ता करून देण्याची मागणी करण्यात आली आहे.