पुणे : राज्यातील तलाठी या गट क संवर्गातील रिक्त पदे सरळ सेवा पद्धतीने भरण्यास राज्य सरकारने मान्यता दिली आहे. या भरतीसाठी सरकारने शिथिलता आणल्यानंतर भूमी अभिलेख विभागाकडून लवकरच परीक्षा घेण्यात येणार आहे. त्यासाठी लिंक खुली करण्यात येणार आहे. त्यानुसार राज्यातील सहा विभागांच्या अंतर्गत येणाऱ्या ३६ जिल्ह्यांतील चार हजार ६४४ पदांच्या भरतीचा मार्ग मोकळा झाला आहे.
पुण्यासह नाशिक, नागपूर, औरंगाबाद, कोकण तसेच अमरावती या विभागातील सर्व जिल्ह्यातील तलाठ्यांच्या चार हजार ६४४ पदभरतीसाठी लवकरच परीक्षा घेण्यात येणार आहेत. नोकरभरतीत आदिवासी समाजाच्या नागरिकांना
संधी मिळावी यासाठी ‘पेसा नियमानुसार जागा आरक्षित करण्यात येणार आहेत. या परीक्षा घेण्यासाठ भूमी अभिलेख विभागाने टीसीएस कंपनीची निवड केली आहे. ही परीक्ष घेण्यासाठी कंपनीकडून १७ ऑगस्ट किंवा १२ सप्टेंबर या दोन तारखांचे पर्याय दिले आहेत.
याबाबत जमाबंदी विभागाचे अतिरिक्त आयुक्त आनंद रायत म्हणाले, “या परीक्षेसाठी लिंक खुल करण्याची परवानगी मागितली आहे येत्या १५ जूनपर्यंत ही लिंक खुल होईल, अशी अपेक्षा आहे. सुमारे पाच लाख उमेदवार परीक्षेसाठी अर्ज भरण्याची शक्यता आहे. एक उमेदवाराला एकाच जिल्ह्यातून अजं भरता येणार आहे. साधारण गटासाठ एक हजार, तर आरक्षण गटासाठी ९०८ रुपये परीक्षा शुल्क असेल.”






