केंद्र शासनाची योजना : २५ लाखांच्या कर्जाची मिळते हमी
केंद्र शासनाने व्यवसायात महिलांची भागीदारी वाढविण्यासाठी महिला उद्योगिनी ही योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत महिलांना तीन लाख रुपयांपर्यंत बिनव्याजी कर्जाची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. उद्योगांमध्ये आजही महिलांची भागीदारी अतिशय कमी आहे. त्यांच्यामध्ये क्षमता असूनही भांडवल जवळ नसल्याने त्या एखाद्या उद्योगांची निर्मिती करू शकत नाही. त्यामुळे विशेष सवलतीच्या दराने कर्जपुरवठा करण्याची योजना केंद्र शासनाने सुरू केली आहे. महिलेला सुमारे २५ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज दिले जाते. काही
महिला बचतगट तयार करून गृह उद्योगाची पायाभरणी करतात. या माध्यमातून गावात व शहरात रोजगाराचे साधन उपलब्ध होते. काय आहे
उद्योगिनी योजना?
■ केंद्र शासनाने व्यवसायात महिलांची भागीदारी वाढविण्यासाठी तसेच महिलांना सवलतीच्या दरात बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी ही योजना सुरु करण्यात आली आहे. ■ या योजनेच्या माध्यमातून महिलांना उद्योगासाठी विशेष मदत दिली जाते.
योजनेचे निकष काय?
■ महिलेचे वय १८ ते ४५ वर्ष असावे. कुटुंबाचे आर्थिक उत्पन्न ४५ हजार रुपये असावे, अशा कुटुंब महिलेला उद्योगिनी योजनेतून कर्ज मिळू शकते. एक लाखाच्या कर्जावर ३० टक्के सबसिडी दिली जाते. महिलांनी उद्योगांसाठी पुढाकार घेण्याची गरज आहे.
‘या’ राष्ट्रीय, खासगी बँकांमध्ये करा अर्ज
■ राष्ट्रीय व खासगी बँकांमार्फत कर्ज उपलब्ध करून दिले जाते. त्यासाठी संबंधित महिला किंवा बचतगट यांनी बँकेकडे अर्ज करावा लागतो. कर्जाची हमी सरकार घेते.
कोणत्या कामासाठी मिळते कर्ज ?
ब्युटी पार्लर, टेलरिंग यासारखे सेवा
क्षेत्र
एखाद्या पदार्थाची निर्मिती
यासाठी महिलांना कर्ज उपलब्ध करून दिले जाते. बचत गटाच्या
माध्यमातूनही कर्ज मिळते.
कमी व्याजात महिलांना तीन लाखांपर्यंत कर्ज
■ महिलांसाठी देण्यात येणाऱ्या सर्वच कर्जावर काही प्रमाणात सूट दिली जाते. तीन लाख रुपयांपर्यंतचे कर्ज अतिशय कमी दरात उपलब्ध करून दिले जाते. पाच लाख रुपयांपर्यंतच्या कर्जासाठी कोणतेही तारण ठेवण्याची आवश्यकता पडत नाही.
‘या’ महिलांना बिनव्याजी कर्ज
■ अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विधवा, निराधार, अपंग महिलांना सुद्धा या योजनेचा लाभ दिला जातो. कर्जावर शासनामार्फत काही प्रमाणात व्याजाची सवलत दिली जाते. परतफेडीनंतर ही सवलत मिळते.
रही
महिलांच्या पुढाकाराची गरज
केंद्र शासनाच्या उद्योगिनी योजनेतून महिलांना स्वयंरोजगाराची संधी उपलब्ध होत आहे. जिल्ह्यातील काही बचत गटांनी यासाठी पुढाकार घेतला आहे.
स्वयंरोजगार सुरू केले आहेत. इतरांनीही पुढाकार घेण्याची गरज आहे.
Home आपला जिल्हा Breaking News महिला उद्योगिनी ही योजना@महिलांना व्यवसायासाठी तीन लाखांपर्यंत बिनव्याजी कर्ज !






