Home आपला जिल्हा Breaking News चहावाल्याची बायको झाली पोलिस @मुंबई पोलिस दलात एक नव्हे तर दो पदांवर...

चहावाल्याची बायको झाली पोलिस @मुंबई पोलिस दलात एक नव्हे तर दो पदांवर निवड

145

जिद्द, मेहनत आणि चिकाटीच्या बळाव कोणत्याही परिस्थितीवर मात करता येते, हे केज येथे रस्त्याव टपरी चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या चहावाल्याच्या बायको सिद्ध करून दाखवून दिले. मुंबई पोलिस दलात एक नव्हे तर दो पदांवर तिची निवड झाली आहे.
केज येथील पोलिर ठाण्यासमोर महामार्गालग बालाजी पाचपिंडे यांची चहाच टपरी आहे. ते लातूर जिल्ह्यातील तांदुळजा येथील मूळ रहिवासी उपजीविकेच्या शोधात त्यांनी तीन वर्षांपूर्वी एक लहानशी चहाची टपर
सुरू केली. यातून त्यांना दिवसाकाठी ६०० ते एक हजार रुपये मिळतात, त्यातूनच त्यांना कुटुंबाचा खर्च भागवावा लागतो. राहायला स्वतःचे घर देखील नाही.

बालाजी यांची पत्नी माधवी १ पाचपिंडे-वाघचौरे हिने पहिली ते • चौथीच्या विद्यार्थ्यांची शिकवणी घेऊन कुटुंबाला हातभार लावला. हे करतानाच तिने पोलिस भरतीची तयारी सुरू ठेवली. लेखी परीक्षेसाठी – इंग्रजी, गणित व सामान्य ज्ञान या – विषयांचाही अभ्यास केला. इतकेच
नाहीतर वाहन चालविण्याचे • प्रशिक्षण पूर्ण केले. माधवी हिची मुंबई पोलिस दलात पोलिस शिपाई आणि चालक या दोन्ही पदावर निवड झाली.
पोलिस ठाण्यात सत्कार
बालाजी पाचपिंडे आणि मुंबई पोलिसांत पोलिसशिपाई आणि चालक म्हणून निवड झालेली त्यांची पत्नीमाधवी या दोघांचा केज पोलिस ठाण्यात निरीक्षकबाळासाहेब पवार यांनी सत्कार केला.लवकरचहोणार रुजू
माधवी लवकरच प्रशिक्षणासाठी रुजू होणार आहे. पती बालाजी पाचपिंडे यांनी दिलेले प्रोत्साहन आणि मोठी नणंद जमादार रुक्मिणी पाचपिंडे यांच्या मार्गदर्शनामुळे हे यश सोपे झाल्याचे माधवी यांनी  सांगितले.