विद्यार्थी वंचित राहू नये म्हणून दोनदा दिली मुदतवाढ केंद्र सरकारच्या मॅट्रिकोत्तर
शिष्यवृत्ती योजनेंतर्गत मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली जाते. ऑनलाइन अर्जासाठी दोनवेळा मुदतवाढ दिल्यानंतर आता ३१ मेपर्यंत शिष्यवृत्तीसाठी अर्ज करता येणार आहे. मुदतीत अर्ज न आल्यास विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीपासून वंचित राहावे लागू शकते. त्यामुळे शिष्यवृत्तीसाठी विद्यार्थ्यांनी तातडीने अर्ज सादर करतावे, असे आवाहन समाज कल्याण विभागातर्फे करण्यात आले आहे.
शिष्यवृत्ती अर्जापासून एकही विद्यार्थी वंचित राहू नये म्हणून शासनाने ३१ मेपर्यंतची मुदत वाढवून दिली आहे. त्यानुसार शैक्षणिक वर्ष २०२२-२३ साठी विद्यार्थ्यांना अजूनही शिष्यवृत्तीसाठी अर्ज भरता येईल. तसेच रिनिवल सुद्धा करता येईल. यामुळे विद्यार्थ्यांसह महाविद्यालयांनाही दिलासा मिळाला आहे. परिपूर्ण अर्ज त्वरित निकाली काढाव्यात अशा सूचनाही शासनाने दिल्या आहे.
काय आहे मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजना ?
शिक्षण गळती कमी करण्यासाठी तसेच उच्च शिक्षणाची आवड निर्माण व्हावी, विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात जाण्याची संधी मिळावी, यासाठी मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजना सुरु करण्यात आली आहे. यात शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्क आणि देखभाल भत्ता यांचा लाभ दिला जातो.
निकष काय?
दहावीनंतरच्या शासनमान्य अभ्यासक्रमाला प्रवेश घेतलेला अनुसूचित जाती, ओबीसी, एसबीसी, व्हीजेएनटी प्रवर्गाचा विद्यार्थी असावा. महाविद्यालय, संस्थेत त्याची उपस्थिती ८० टक्क्यांपेक्षा अधिक असणे आवश्यक आहे.






