Home आपला जिल्हा Breaking News नांदगाव येथे @चिमुकली करते दोरखंडावर कसरत

नांदगाव येथे @चिमुकली करते दोरखंडावर कसरत

100

पोटाच्या खळगीसाठी पाच वर्षांची चिमुकली करते दोरखंडावर कसरत
पोटाची खळगी भरण्यासाठी कोणाला काय काय करावे लागते, याचा प्रत्यय मूल तालुक्यातील नांदगाव येथे आला. शिक्षणाची बाराखडी गिरविणे, खेळणे- बागडणे, अशा बालवयात एक पाच वर्षांची चिमुकली चक्क उंचावर दोरखंड बांधून त्या दोरखंडावर चालण्याची सर्कस करीत होती. बघणाऱ्यांच्याही काळजाचा ठोका चुकावा, असे हे दृश्य होते.
छत्तीसगड येथील एक दाम्पत्य आपल्या दोन मुली व मुलासह आपल्या पोटाची खळगी भरण्यासाठी गावोगावी फिरून अशी सर्कस (कवायती) करून आपल्या कुटुंबाची उपजीविका भागविण्याचा प्रयत्न करीत आहे. मूल तालुक्यातील नांदगाव येथे हे कुटुंब पोहोचले.
कुटुंबातील पाच वर्षांची चिमुकली बांबूच्या साहाय्याने उंच बांधलेल्या दोरखंडावर चढली. केवळ चढलीच नाही, तर हातात एक बांबू घेऊन ती आपला तोल सांभाळत चक्क दोरखंडावर चालत होती. हा जीवघेणा खेळ केवळ बघणाऱ्यांकडून पैसे मिळावेत, त्यातून कुटुंबाचा उदरनिर्वाह व्हावा, यासाठी ते करीत असल्याचे त्यांनी सांगितले.