मुल तालुक्यातील नालेश्र्वर येथील घटना
मुल तालुक्या अंतर्गत येणाऱ्या नलेश्र्वर येथील गायमुख देवस्थान जवळील असलेल्या गावतालावत नेहमी प्रमाणे बैल धुण्यासाठी गेला असता तोल गेल्याने खोल खड्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. मृतक आकाश लक्ष्मण कुमरे वय 24 वर्ष हा युवक नलेश्वर गायमुख जवळील गाव तलावात सायंकाळी 5 वाजताच्या सुमारास बैल धुण्यासाठी गेला असता खोल पाण्यात जाऊन पाय घसरल्या मुळे त्यात बुडून त्याचा मृत्यू झाला. गावात सर्वत्र हळहळ होत असून त्याचे पश्चात आई आणि दोन भाऊ व एक बहिण असा आप्त परिवार आहे.
Post Views: 246