विद्युत खांब घेऊन जाणारा ट्रॅक्टर पलटल्याने दोन मजुरांचा मृत्यू झाल्याची घटना चंद्रपूर जिल्ह्यातल्या मूल तालुक्यातील पिपरी दीक्षित -भंजारी मार्गावर घडली. या घटनेत दोन मजूर गंभीर जखमी झाले आहेत. मिथुन पांडुरंग मडावी, अंकुश राजू गंदेरशीरवार अशी मृतांची नावे आहेत. तर सुभाष रणदिवे, ईश्वर मांडवकर हे दोघे जखमी झाले असून हे सगळे मूल तालुक्यातील केळझर येथील रहिवासी आहेत.
घटनेची माहिती मिळताच मूल पोलीस घटनास्थळी पोहोचत ट्रॅक्टर खाली दबलेल्या दोघांनाही बाहेर काढण्यात आलं. गंभीर जखमी असलेल्यांना दोघांना तत्काळ उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आले. या घटनेने परिसरात शोककळा पसरली आहे. पुढील तपास मूल पोलीस करीत आहेत.






