मूल (वा.). प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना ही एक शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण योजना आहे. या योजनेद्वारे, सरकारकडून दरवर्षी रुपये 6000 रुपयाची रक्कम तीन समान हप्त्यांमध्ये खात्यात (डीबीटी) द्वारे हस्तांतरित केली जाते. परंतु शेतकऱ्यांनी बँक खाते आधारशी संलग्न केले नसल्यामुळे अनेक शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा हप्ता मिळण्यास अडचण जात आहे. तसेच कित्येक पीएम किसान योजना खाती निष्क्रय झाली आहेत.
शेतकऱ्यांची
आर्थिक स्थिती सुधारण्याच्या उद्देशाने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना सुरू करण्यात आली आहे. ज्या शेतकऱ्यांकडे कोरडवाहू किंवा बागायती शेती आहे. अशा सर्व शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा लाभ दिला जातो. या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्याला पीएम किसान योजनेचा लाभ दिल्या जात आहे. पीएम किसान सन्मान निधी योजना खाते आधारशी लिंक करणे लाभार्थ्यांसाठी खूप महत्त्वाचे आहे. ज्या शेतकऱ्यांनी या योजनेंतर्गत सरकारकडून 6000 रुपयांची आर्थिक मदत देण्यासाठी अर्ज केला आहे आणि त्यांना ही रक्कम मिळवायची आहे. यासाठी त्यांचे बँक खाते आधारशी लिंक करणे आवश्यक आहे.
जर एखाद्या शेतकऱ्यांने आपला आधार बँकेशी लिंक केले नसेल तर बँकेत जाऊन लिंक करून पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेचा लाभ घ्यावा असे शासनाकडून आदेश देण्यात आले आहेत. परंतु खातेदार शेतकरी आणि बँका यांचा योग्य समन्वय नसल्यामुळे अनेक शेतकऱ्यांची बँक खाती ही आधार संलग्न नसल्याने शेतकरी पीएम किसान योजनेच्या लाभापासून वंचित आहेत.
बँक खाते आधारशी लिंक नाही; हप्ता मिळण्यास अडचण
योजनेचा हप्ता थांबविला
मी पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेचा
नियमित खातेदार आहे. मी पीएम किसान योजनेचा लाभ घेत आहे. माझे बँक खाते आधारशी संलग्न नसल्याने वरील योजनेपासून वंचित आहे. वरिष्ठ पातळीवर विचारणा केली असता आधार बँक संलग्न नसल्याने आपला पीएम किसान योजनेचा
हप्ता रोखण्यात आला आहे, असे कळले. बँकेशी संपर्क केला असता बँक सहकार्य करण्यास तयार
नाही.
-सुनील मूनगेलवार शेतकरी, चांदापुर.
बँक सहकार्य करीत नसल्याची ओरड
शेतकऱ्यांची बँक खाती आहेत. परंतु ही बँक खाती आधारशी सलंग्न नसल्याने पी. एम किसान योजनेचा मिळणारा हप्ता प्राप्त करण्यास शेतकऱ्यांना शासनाकडून आधार
बँक खाते संलग्न करण्यास
सांगितले आहे. परंतु या प्रक्रियेत बँका सहकार्य करीत नसल्याची ओरड शेतकऱ्यांकडून होत आहे.
Home आपला जिल्हा Breaking News बँक खाते आधारशी लिंक नाही; हप्ता मिळण्यास अडचण@पीएम किसान योजनेचे खाते निष्क्रिय






