आता बस स्थानक होणार टापटीप बस स्थानकांना मिळणार रोख बक्षीस सन्माननीय मुख्यंमंत्री तथा अध्यक्ष एसटी महामंडळ यांनी महामंडळाच्या ३०२ व्या संचालक मंडळाच्या बैठकीत सर्व बसस्थानके, बसस्थानक परिसर व प्रवासी बसेस या स्वच्छ व टापटिप असाव्यात अशी अपेक्षा व्यक्त केली, त्यांनी या संदर्भात स्पर्धात्मक स्वरुपात अभियान राबवून उत्कृष्ट बसस्थानकांना रोख बक्षीस देवून गौरविण्यात यावे, असे निर्देशही दिले आहेत.त्यानुसार एसटी महामंडळाचे अभियानाचा कृती आराखडा तयार केला आहे.
या अभियानाचा कालावधी में २०२३ ते एप्रिल २०२४ आहे., अंतीम स्पर्धेमध्ये महाराष्ट्रतून पहिला येणा-या बसस्थानकांना खालीलप्रमाणे बक्षिस देण्यात येणार आहे.‘अ’ वर्ग प्रथम कंमाक रुपये ५० लाख चषक व प्रशस्तीपत्र‘ब’ वर्ग – प्रथम कंमाक रुपये २५ लाख चषक व प्रशस्तीपत्र
‘क’ वर्ग- प्रथम क्रमाक रुपये १० लाख चषक व प्रशस्तीपत्रया स्पर्धेसाठी परिक्षण समित्या नेमण्यात येणार असून दर दोन महिन्यांनी प्रत्येक बसस्थानकांचे स्पर्धात्मक परिक्षण करण्यात येणार आहे.
या स्पर्धेमध्ये चंद्रपूर विभागातील बसस्थानक, बसस्थानकावरील स्वच्छतागृहे, प्रवासी बसेस यांच्या स्वच्छते बरोबरच सुशोभिकरण व टापटीप इत्यादी कामे करण्यात येणार आहे. या बरोबरच या अभियानामध्ये कर्मचान्यांची आरोग्य तपासणी करण्यात येणार असून, कर्मचान्यांनी प्रवाशांसोबत सौदाहार्याने वागणे, उत्पन्न वाढीसाठी प्रयत्न करणे, बसेसचा वक्तशिरपणा राखणे इत्यादी वर भर देण्यात येणार आहे.चंद्रपूर व मुल बसस्थानकावर वन व वन्यजीव संकल्पनेच्या आधारावर म्युरल / पेंटिंग, कॅनव्हास पेंटिंग, स्क्लप्चर आर्ट वर्क, सी.एन.सी. आर्ट, बांबु पेंटिंग इत्यादी रंगरंगोटी चित्रकला महाविद्यालय, नागपुर यांचे मार्फत करण्यात येणार आहे. मुल बसस्थानकातील कॅपेट एरिया मध्ये असलेल्या दुकानांना रंगरंगोटी करुन आकर्षक स्वरुप देण्यात येणार आहे. तसेच पायऱ्या जवळ असलेल्या प्लनेट मध्ये झाडे लावण्यात येणार आहे. घुग्गूस येथील बसस्थानकावर झाडे लावून सुशोभिकरण करण्यात येणार आहे. चिमुर बसस्थानकाच्या मुख्य रस्त्यालगत चिमुर कांती म्युरल बनविण्याचे काम अंतीम टप्यात आहे. तसेच चिमुर बसस्थानकावर प्रवासी येणाऱ्या मार्गावर झाडे लावून सुशोभिकरण करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे भद्रावती, वरोरा, बल्लारपूर आणि राजुरा बसस्थानकावर किरकोळ डागडुजी करुन सुशोभिकरण करण्यात येणार असल्याचे विभाग नियंत्रक रा.प. चंद्रपुर यांनी कळविले आहे.






