Home आपला जिल्हा Breaking News शासकीय कार्यालये एका छताखाली असावीत ! तहसीलदार मार्फत जिल्हाधिकारी चंद्रपूर यांना निवेदन.

शासकीय कार्यालये एका छताखाली असावीत ! तहसीलदार मार्फत जिल्हाधिकारी चंद्रपूर यांना निवेदन.

123

मूल शहरातील दोन महत्वाची कार्यालये अनुक्रमे दुय्यम निबंधक कार्यालय व तालूका क्रुषी अधिकारी कार्यालय ही दोन्ही कार्यालये प्रशासकीय भवन व पंचायत समितीच्या कार्यालयापासून बऱ्याच अंतरावर असल्यामुळे आणि ही दोन्ही कार्यालये किरायाच्या घरात असून शासनाच्या महसुलाचा निरर्थक खर्च केला जात आहे , या दोन्ही कार्यालयात शेतकरी, ग्राहकांना प्राथमिक सोयीसुविधांचा मोठा अभावसुद्धा असल्यामुळे दूरवरून येणाऱ्या ग्राहकांना मोठ्या प्रमाणात त्रासदायक ठरत आहे.

छोट्या छोट्या कारणांमुळे या कार्यालयातून त्या कार्यालयात पायपीट करावी लागत असते, परिणामी या दोन्ही कार्यालयाचे कामकाज ही दोन्ही कार्यालये प्रशासकीय भवनातील मोठ्या दालनात थाटल्या गेलीत तर जनतेला सोयिस्कर होईल ही जनतेची आर्त हाक ऐकून नगरातील काही सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार तथा शेतकरी यांनी एकत्रित येऊन “शासकीय कार्यालय स्थलांतरण संघर्ष समितीची” स्थापना करुन उपरोक्त दोन्ही कार्यालये प्रशासकीय भवनात स्थलांतरित करावी यासाठी एक निवेदन जिल्हाधिकारी यांचे नावे तहसीलदार मूल यांचे मार्फतीने देण्यात आले.

ह्या इमारतीत ,तलाठी कार्यालय , मंडल अधिकारी कार्यालय , नायब तहसिलदार निवडणूक, नायब तहसिलदार संगानियो, श्राबानियो, निवासी नायब तहसिलदार ,पुरवठा विभाग, कोषागार कार्यालय (ट्रेझरी) , उपनिबंधक सहकारी संस्था कार्यालय , तहसील कार्यालय, उपविभागीय अधिकारी कार्यालय आदी कार्यालये आहेत.

मूल शहरात महाराष्ट्र राज्याचे तत्कालीन अर्थमंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नातून एक भव्यदिव्य प्रशासकीय भवन उभारण्यात आले ,ज्याचा मुळ उद्देशच मूल शहरातील विविध शासकीय कार्यालये एका छताखाली असावीत आणि जनतेला विविध कामासाठी वेगवेगळ्या कार्यालयांची पायपीट करावी लागू नये ,हाच होता.शेतकऱ्यांना वारंवार हेलपाटे मारावी लागणारी अतिशय महत्वपुर्ण अशी कार्यालये ज्यामध्ये, सोयीसुविधांचा भरपूर अभाव आहे अशी तालुका कृषी अधिकारी कार्यालय व दुय्यम निबंधक कार्याल , यांचा समावेश आहे 

हे निवेदन मूलचे नायब तहसीलदार यशवंत पवार यांनी स्विकारले त्यावेळी पत्रकार प्रकाश चलाख ,प्रमोद मशाखेत्री ,दीपक देशपांडे , सामाजिक कार्यकर्ते नरेश वैद्य व इतर शेतकरी बांधव उपस्थित होते.